औद्योगिक भूखंड विकसित करण्यासाठी ‘एमआयडीसी’मार्फत 30 जूनपर्यंत मुदतवाढ

 औद्योगिक भूखंड विकसित करण्यासाठी ‘एमआयडीसी’मार्फत 30 जूनपर्यंत मुदतवाढ

लातूर: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रात वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचे नकाशे मंजूर करून अथवा नकाशे मंजूर न करता बांधकाम पूर्ण केलेले आहे व भूखंडधारक उत्पादनात गेलेला आहे अथवा उत्पादनात जावून  सद्यस्थितीत उत्पादन बंद आहे, अशा वाटप केलेल्या सर्व प्रकारच्या भूखंडासाठी  इमारत पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करण्यासाठी  विशेष मुदतवाढ योजना लागू करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी  पात्र भूखंडधारकांनी  30 जून 2023 पर्यंत महामंडळाच्या  www.midcindia.org  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. योजनेतील सविस्तर तरतुदी महामंडळाच्या संकेतस्थळावर 23 जानेवारी 2023 च्या परिपत्रकात उपलब्ध आहे, असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी यांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم