सैनिक फेडरेशनच्या लातूर जिल्हा संघटकपदी किशन कोलते यांची निवड
लातूर(प्रतिनिधी)ः औसा तालुक्यातील मुळ कन्हेरी गावचे रहिवासी असलेले किशन बन्सीलाल कोलते यांची नुकतीच राज्यस्तरीय सैनिक फेडरेशनच्या लातूर जिल्ह्याचे संघटक म्हणून नियुक्त पत्र संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार व सेवानिवृत्त ब्रेगेडियर सुधीर सावंत साहेब यांनी प्रदान केले असून त्यांच्यावर लातूर जिल्हा संघटकाची जबाबदारी सोपविली आहे.श्रीकिशन बन्सीलाल कोलते यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक व माजी सैनिकांचे कल्याण अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहून एका सैनिकाच्या मुलाचे लातूर जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे. यापुर्वी ते साप्ताहिक शतकवीरचे झुंजार संपादक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. सानेगुरूजी कथामाला ते राज्य सदस्य आहेत. 1990 च्या साक्षरता अभियानात त्यांनी लातूर जिल्ह्याच्या साक्षरता अभियानात वातावरण निर्मितीच्या कामात प्रमुख भुमिका बजावली होती.
सैनिकांच्या कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी सैनिकांना त्यांच्या विविधांगी कार्याचा फायदा होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल लातूर जिल्ह्यातील अनेक शुभचिंतक, हितचिंतक, संपादक, विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले आहे. यामध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर देवस्थान समितीचे सहध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर, सद्गुरू गुरूबाबा महाराज, लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार, त्याचप्रमाणे औसा तालुका वीरशैव समाजाचे तालुकाध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, औसा तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.काशीनाथ सगरे, ज्येष्ठ पत्रकार शामभाऊ कुलकर्णी, विजयकुमार बोरफळे, डॉ.धाराशिवे, डॉ.पटणे, डॉ.आरद, डॉ.बाजपाई, डॉ.रणदिवे, पत्रकार रामभाऊ कांबळे, संपादक हंचाटे, माजी नगराध्यक्ष अफसर शेख, वारकरी संघटना औसा तालुका संघटक गोरोबा कुरे, प्रा.शिवकुमार मुरगे, श्री महादेवप्पा कुरसूळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुरेशदादा भुरे, प्रा.अशोक अभंगे, संपादक राजु पाटील, संभाजी सुळ, बाबासाहेब बावणे, अॅड.अण्णासाहेब पाटील, तिपणप्पा राचट्टे इ. मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सैनिक संघटनेमध्ये येणार्या काळात जनसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचे कार्य सैनिक फेडरेशनच्या सैनिक सेवक म्हणून केले जाणार आहे.
إرسال تعليق