विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याकडून ऊस तोडणी यंत्र वाटप योजना जाहीर.

 विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याकडून ऊस तोडणी यंत्र वाटप योजना जाहीर.


विलासनगर :-- कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असलेली ऊस लागवड जोपासणा व त्यातुन मिळत असलेले हेक्टरी उत्पादन तसेच गळीतासाठी कारखान्यास मिळत असलेला ऊस विचारात घेता, संपुर्ण ऊसाचे गाळप करणेसाठी कारखाना दैनिक गाळप क्षमतेचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतलेला आहे. त्यानुसार पुढील हंगाम २०२३-२४ पासुन कारखान्याची दैनिक गाळप क्षमता ७,५०० मे.टन होत आहे. दैनिक गळीतासाठी लागणारा पुरेसा ऊस तोड करून आणणेसाठी दिवसें दिवस मजूरांची भासत असलेली टंचाई विचारात घेता. कारखान्याने मागील दोन हंगामात ४१ ऊस तोडणी यंत्राचे वाटप कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षि मा. श्री.दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून कार्यक्षेत्रातील होतकरू, सुशिक्षीत तरूण व ऊस उत्पादक, तोडणी ठेकेदारांना केलेले आहे. त्यामधून कारखाना कार्यक्षेत्रातील गरजू व होतकरू तरूणांना नवीन रोजगार मिळाला आहे. कार्यक्षेत्रातील होतकरून तरूणांना आणखीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने कारखान्याच्या पुढील हंगामासाठी आणखी १५ नविन ऊस तोडणी यंत्र कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक व तोडणी ठेकेदारांना वाटप करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री व कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षि मा श्री दिलीपरावजी देशमुख साहेब व महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री मा.आ. अमित विलासरावजी देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाने घेतलेला आहे. सदर ऊस तोडणी वाटप यंत्र योजना ही लातूर ग्रामीणचे आमदार व लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन मा.श्री.धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली यशस्वीपणे मार्गक्रमण करत असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., च्या सहकार्याने राबवण्यात येणार आहे.

तरी नविन ऊस तोडणी यंत्र खरेदी करू इच्छिणा-या होतकरू तरूण, ऊस उत्पादक व तोडणी वाहतुक ठेकेदारांनी आपल्या नावाची नोंदणी करणेसाठी मांजरा कारखान्याकडे दिनांक १० मार्च २०२३ पर्यंत अर्ज दाखल करावेत, अधिक माहितीसाठी कारखाना मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा व कारखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याचे व्यवस्थापनाने केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم