'मराठवाड्याची मुक्तीगाथा समजून घेताना’ या विषयावर कौस्तुभ दिवेगावकर यांचे व्याख्यान.

 


'मराठवाड्याची मुक्तीगाथा समजून घेताना’    या विषयावर कौस्तुभ दिवेगावकर यांचे व्याख्यान.

लातूर : हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी  वर्षानिमित्त  'बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन, व वेदप्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालय. लातूर  यांच्या संयुक्त विद्यमाने *‘मराठवाड्याची मुक्तीगाथा समजून घेताना’* या विषयावर   व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद.पुणेचे संचालक मा. कौस्तुभ दिवेगावकर हे विचार मांडणार आहेत.
अध्यक्षस्थानी डॉ.मायाताई कुलकर्णी व प्रमुख उपस्थिती प्राचार्य हरिष देशपांडे यांची राहणार आहे.
हे व्याख्यान  दिनांक ४ मार्च २०२३ शनिवारी खोरे गल्लीतील वेद प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालय येथे
सायंकाळी ५:३० वाजता संपन्न होणार आहे.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात तरी मराठवाड्यातील जनतेने समकालीन संदर्भ समजून घेतले पाहिजेत.इतिहासाचा अभ्यास का महत्त्वाचा आहे.मराठवाड्याच्या इतिहासाचा व
वर्तमानाचा विचार करताना नेमके कोणते समकालीन संदर्भ पाहणे आवश्यक आहे.

हैदराबादचा मुक्तिसंग्राम हा धार्मिक लढा होता का ?अशा विविध मुद्दांचा उहापोह सदरील
व्याख्यानात होणार आहे.

           या व्याख्यानास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ऍड. मनोहरराव गोमारे, ऍड.धनंजयभाई पाटील, अशोक गोस्वामी, संभाजी लांडे, डॉ.अनिल जायभाये, सुपर्ण जगताप, श्री सूर्यकांत वैद्य, श्री माणिकराव कोकणे,
अरविंद लातुरे, सुरेंद्र चव्हाण, डॉ.बी.आर. पाटील, भाऊसाहेब उमाटे, दिलीप कानगुले. राहुल लोंढे, अर्चना आल्टे, विश्वनाथ होळकुंदे, श्री माधव बावगे, श्री प्रकाश घादगिने,राहुल लोंढे, प्रा. शंकर भोसले,भीम दुनगावे यांनी केले आहे.     

Post a Comment

أحدث أقدم