भूसणी येथे पशु चिकित्सा व औषधोपचार शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 भूसणी येथे पशु चिकित्सा व औषधोपचार शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर =


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील दुग्धशास्त्र विभाग, प्राणीशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास-ग्राम-शहर विकास विशेष युवक वार्षिक शिबिर अंतर्गत मौजे भूसणी येथील पशु चिकित्सा व औषधोपचार शिबिरास पशुधन ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  
या शिबिराचे उद्घाटन पशुधन विकास अधिकारी डॉ. एच. जी. निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. व्ही. हराळकर, डॉ. डी. बी. शेल्लाळे, डॉ. ए. एम. शेख, डॉ. राजेश कदम, एन. आर. देशमुख, प्राणीशास्त्र आणि दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विनायक वाघमारे, दुग्धशास्त्र विभागातील डॉ. गुणवंत बिरादार, सरपंच विरभद्र स्वामी, उपसरपंच धोंडीराम माने, पोलिस पाटील अण्णासाहेब पाटील, बालाजी हुलसुरे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे आणि डॉ. संजय गवई यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात २४ गर्भ तपासणी, १७ वंध्यत्व तपासणी, ६६ औषधोपचार, २२ जंत निर्मूलन आणि १२ गोचीड निर्मूलन अशा एकूण १४१ पशुधनावर तज्ञ डॉक्टराकडून तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले.  
यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. एच. जी. निंबाळकर, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विनायक वाघमारे, डॉ. गुणवंत बिरादार यांनी मार्गदर्शनही केले.  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय गवई यांनी केले तर आभार डॉ. रत्नाकर बेडगे यांनी मानले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी योगेश मोदी, संतोष येचवाड, भीमाशंकर दळवी, माधव पांचाळ विश्वनाथ पर्वत, पूजा कुलकर्णी, वैभव चव्हाण, धनराज माने, रोहित गायकवाड, गणेश चव्हाण, आकाश शिंदे, योगेश्वर मुळे, शिरीष चोथवे, गणेश भावे, आकाश जाधव, गणेश जाधव यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील सहभागी स्वयंसेवक-सेविका आणि गावातील ग्रामस्थानी परिश्रम घेतले.  

Post a Comment

أحدث أقدم