*बनारसी गायक पं.राहुल व रोहित मिश्रा यांच्या गायनाने लातूरकर रसिक श्रोते मंत्रमुग्ध*

 *बनारसी गायक पं.राहुल व रोहित मिश्रा यांच्या गायनाने लातूरकर रसिक श्रोते मंत्रमुग्ध* 







लातूर :-  येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूर आणि रोटरी क्लब, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब हॉल,राजीव गांधी चौक,लातूर या ठिकाणी बनारस येथील सुप्रसिद्ध गायक पं.राहुल व रोहित मिश्रा यांनी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत सभेप्रसंगी आपल्या बनारसी गायनाच्या बहारदार जुगलबंदीने लातूरकर रसिक-श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
      या संगीत सभेची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आणि दीपप्रज्वलनाने झाली.याप्रसंगी रोटरी क्लब,लातूरचे अध्यक्ष श्री.सुनील कोचेटा,माजी रोटरी गव्हर्नर हरिप्रसादजी सोमाणी,श्री.रो.जोधवानी,रो.अॅड   सोनकवडे,तालमणी डाॅ.राम बोरगांवकर,पं
राहुल मिश्रा,पं.रोहित मिश्रा,सुरमणी पं.बाबुराव बोरगावकर हे उपस्थित होते.
        या कार्यक्रमाच्या प्रारंभी पं.राहुल आणि रोहित मिश्रा यांनी राग मारवा मध्ये मध्यलयीत ' यही भवरा गुंज गुंज 'ही मध्यलय बंदिश अतिशय तयारीने सादर करून रसिक स्त्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद घेतली.त्यानंतर त्यांनी ध्रुत एकताल मध्ये बंदिश ' सांज भयी गुणी जन गाओ ' ही द्रुत चीज गायली.त्यानंतर राग मिश्रा खमाज मध्ये ' इतनी आरज मोरी सुनो ' ही ठुमरी बहारदारपणे सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
     या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी ' होरी ' या अनोख्या गीतप्रकारामध्ये ' रंग डालुंगी नंद के लाल 'ही होरी गायली.त्यानंतर त्यांनी दादरा हा गीतप्रकार ' दिवाना  किए शाम जादू डाला '
हे गीत गायल्यानंतर रसिकांकडून त्यांनी वन्समोर मिळाली.कार्यक्रमाची सांगता ' धन्य भाग सेवा का अवसर पाया ' या सुप्रसिद्ध भैरवी गायनाने झाली.या संपूर्ण कार्यक्रमास बहारदार तबलासंगत तालमणी डाॅ.राम बोरगांवकर यांनी केली तर तितक्याच तयारीने हार्मोनियम  साथ सुरमणी पं.बाबुराव बोरगावकर यांनी दिली.
    या सुश्राव्य बनारसी गायकांच्या गायनाचा लातूरकर रसिक श्रोत्यांनी मनमुराद आनंद घेतला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.विश्वनाथ स्वामी यांनी केले तर उपस्थित रसिकांचे आभार तालमणी डाॅ.राम बोरगावकर यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم