विलासराव देशमुख फाउंडेशन व आयएमएच्या वतीने पाखरसांगवी येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिराचे

 विलासराव देशमुख फाउंडेशन व आयएमएच्या वतीने पाखरसांगवी येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिराचे


 विलासराव देशमुख फाउंडेशन व आयएमएच्या वतीने लातूर तालुक्यातील
पाखरसांगवी येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिराचे
आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत
असलेल्या सर्व महिला डॉक्टरांचा विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने
स्वागत करण्यात आले.
पांखरसांगवी येथील नागरीकांना डॉक्टरांकडून आरोग्य विषयी जनजागृती
करण्यात आली. या शिबिरामध्ये महिलांना व पुरुषांची  पूर्व कर्करोग निदान
याविषयी जनजागृती व नेत्ररोग, पोटाचे आजार, जठराचे आजार, कॅन्सर, बालरोग,
महिला आरोग्य तपासणी, अश्या विविध आजारावर मोफत तपासणी करण्यात आली.
 या शिबिरामध्ये  डॉ.कल्याण बरमदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.लक्ष्मण
देशमुख , डॉ. अजय पुनपाळे, डॉ. मनीषा बरमदे, डॉ. चलवडे मॅडम, वलसे मॅडम,
डॉ. डोपे मॅडम, डॉ. उदगीरकर मॅडम, डॉ. पुरी मॅडम, डॉ. ऋषाली मॅडम, डॉ.
साबद, डॉ विश्रांत भारती, डॉ. संदीप साबदे यांनी आरोग्य तपासणी केली.
शिबीरात ६२ महिलांची व १०  पुरूष असे एकूण ७२ लोकांची  मोफत  तपासणी आणि
महिलांच्या आजारांविषयीचे तपासणी करण्यात आली. आरोग्याची निगा कशी
राखावी, काळजी कशी घ्यावी, याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराला विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगिता मोळवणे, सरपंच
भीमाशंकर लाखदिवे, अविनाश देशमुख, रामेश्वर धुमाळ, श्रीजित ढगे, मनोज
ढगे, रामेश्वर लाखदिवे, राजकुमार शिगण, प्रथमेश गताळकर, महेश क्षीरसागर,
संस्थेचे सोशल प्लॅनर गजानन बोयणे, सहकारी मेघराज देशमख, सोमनाथ कावळे
गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم