शिवरायांचा सर्वसमावेशक विचार आत्मसात करुन युवकांनी व्यक्तीमत्व विकास करावा - पल्लवीताई हाके पाटील

 शिवरायांचा सर्वसमावेशक विचार आत्मसात करुन युवकांनी व्यक्तीमत्व विकास करावा - पल्लवीताई हाके पाटील

                महाराष्ट्राचे आराध दैवत छत्रपती शिवाजी माहाराज यांनी तळागाळातील लोकांना एकत्र करत त्यांच्य हक्कासाठी अन्यायी शक्ती विरुध्द सर्वसमावेशक लढा उभारुन स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य शिवरायांच्या व त्याच्या सोबत काम करणाऱ्या मावळयांच्या पराक्रमामुळे व त्यागामुळे आपल्याला मिळाले आहे. शिवरायांच्या या सर्वसमावेशक विचाराला युवकांनी आत्मसात करुन आपले व्यक्तीमत्व घडवावे असे आवाहन पल्लवीताई हाके पाटील यांनी केले.

जेएसपीएम संचलित एमआयडीसीकळंब रोड येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या सभागृहात शिवशाही ग्रुप महाराष्ट्र राज्य लातूर च्यावतीने शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्याते पल्लवीताई हाके पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास ॲङ गणेश गोजमगुंडेप्राचार्य गोविं शिंदेशिवशाही ग्रुप महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष चैतन्य फिस्केरमेश शिंदेपूनम पांचाळ, प्रियंका जोगदंड आदी मान्यवर पस्थित होते.

छत्रपती शिवरायांचे विचार शालेय अभ्यासक्रमातून रुजविण्याची गरज - अजितसिंह पाटील कव्हेकर

            छत्रपती शिवरायांनी राष्ट्रमाता जिजाऊच्या संस्कारात स्वराज्य उभारणीचे धडे घेऊन रोहिडेश्‍वरांच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. त्यांनी अत्यंत कमी वयामध्ये स्वराज्याची निर्मिती केली. त्यामुळे एक दिवस शिवजयंतीचा उपक्रम करण्यापेक्षा शालेय अभ्यासक्रमातून शिवरायांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्याचे काम करावे आणि त्याच विचारावर आपण वाटचाल करावी असे प्रतिपादन भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.

शिवशाही ग्रुप महाराष्ट्र राज्य लातूर च्यावतीने मागील अनेक वर्षांपासुन विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. थंडीच्या दिवसात अनाथाना चादर व गरम करडयांचे वाटप, वृक्षारोपन तसेच स्वच्छता अभियान राबवुन नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्मान करण्यात येते. याचाच एक भाग म्हणुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने पल्लवीताई हाके पाटील यांच्या शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभीच प्रमुख मान्यवरांचे स्वागत शिवशाही ग्रुप महाराष्ट्रच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशाही ग्रुप महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष चैतन्य फिस्के यांनी केले. प्रारंभी अ‍ॅड. गणेश गोजमगुंडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले तर आभार अ‍ॅड पूनम पांचाळ यांनी मांनले. या व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी सं.सचिव विजय महाजन , प्रमुख ऋषिकेश क्षिरसागर, शाम गुंजोटे, अविनाश पाटील, यश घोडके, दीपक राठोड, अरविंद शेळके, शिवम किसबे, चैतन्य प्रयाग, अक्षय शिंदे, विजय पवार, पवन वाघमारे, अजय पिडगे, शाम खंडागळे, आशितोष गड्डे, निखील काळदाते, लिंबराज किवडे, आशितोष गायकवाड, श्रेयस मुंडलिक, मनोज साखरे, शेखर रामतीर्थ आदींनी परीश्रम घेतले. 

Post a Comment

أحدث أقدم