जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम.परीक्षेचे गुणपत्र व प्रमाणपत्र घेवून जाण्याचे आवाहन

 जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम.परीक्षेचे गुणपत्र व प्रमाणपत्र घेवून जाण्याचे आवाहन

   लातूर : सहकार आयुक्त व निबंधक यांच्या कार्यालयामार्फत जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. 2022 चा निकाल 18 जानेवारी 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेस बसलेल्या परीक्षार्थींनी आपले गुणपत्र व प्रमाणपत्र लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयातून घेवून जावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.

गुणपत्रक घ्यावयास येताना सोबत ओळखीचा पुरावा घेवून येणे आवश्यक आहे. जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा 2022 चे गुणपत्र व प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थामध्यवर्ती प्रशासकीय इमारततळमजलाजुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाशिवाजी चौकलातूर (दूरध्वनी क्र. 02382-245193) येथे उपलब्ध आहे.

Post a Comment

أحدث أقدم