ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक वापर मर्यादा शिथील ठेवण्याचे दिवस निश्चित

 ध्वनीक्षेपकध्वनीवर्धक वापर मर्यादा शिथील ठेवण्याचे दिवस निश्चित

लातूर : वर्षातील 15 दिवसांसाठी ध्वनीची विहित मर्यादा कायम ठेवून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरासाठी परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने लातूर जिल्ह्यात सन 2023 मध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यासाठीची मर्यादा (ध्वनीची विहित मर्यादा राखून) शिथील ठेवण्याचे दिवस (15 दिवस) निश्चित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी निर्गमित केले आहेत.

शिवजयंतीचा एक दिवसडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा एक दिवस1 मे महाराष्ट्र दिनगणपती उत्सवाचा पाचवा (गौरी विसर्जन), सातवा, अनंत चतुर्दशीचा आदला दिवस व अनंत चतुर्दशीचा दिवस व ईद-ए-मिलाद,  नवरात्री उत्सवातील अष्टमी व नवमी, दिवाळीतील लक्ष्मीपूजन, ख्रिसमस, 31 डिसेंबर, दिवाळी पाडवा व रमजान ईद आणि इतर एक दिवस प्रासंगिक या 15 दिवसांसाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी ही सूट लागू नसून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त तथास्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहणार आहे, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم