औसा बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार....!

औसा बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार....!
कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना( उध्दव ठाकरे गट) बेठक संपन्न...


औसा प्रतिनिधी- अवघ्या कांही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून यासाठी महाविकास आघाडीची महत्वाची बेठक रविवार दि.२६ रोजी पार पडली यात कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उध्दव ठाकरे गट तिन्ही पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले यात तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असून आगामी उमेदवारी बरोबर निवडणुकीची पुढील दिशा ठरवली जाणार आहे..
सन 2011 साली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती
निवडणूक झाली त्यानंतर तब्ब्ल 12 वर्षानंतर पहिल्यादा निवडणूक होत असल्याने या निवडणुकीत चुरस होणार आहे राज्यातील महाविकास आघाडीचा औसात ही कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले आहेत रविवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बेठकीत कांग्रेसचे नेते जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपती काकडे, जिल्हा कांग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी, कांग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शेषेराव पाटील, कांग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष पवार,शिवसेना तालुकाप्रमुख सतीश शिंदे, मारुती महाराज साखर कारखाना चेअरमन गणपती बाजूळगे ,व्हाईसचेअरमन शाम भोसले,, बबन भोसले, योगीराज पाटील, अड. श्रीकांत सुर्यवंशी,दत्तात्रय कोळपे, भरत सुर्यवंशी, शाम पाटील,कांग्रेसचे अमर खानापुरे बसवराज धाराशिवे,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हणमंत राचट्टे, माजी नगराध्यक्ष सुनील मिटकरी, उदय देशमुख, मल्लिकार्जुन वाडीकर, नारायण लोखंडे,किशोर जाधव,खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, राजेंद्र भोसले ,विश्वास काळे,सुग्रीव लोंढे, दिपक बिराजदार, महेश पाटील, रवी पाटील, अरूण मुकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم