ग्रंथापाल सुरेश जाधव यांना‌ २०२२-२३चा आदर्श ग्रंथापाल पुरस्कार जाहीर

ग्रंथापाल सुरेश जाधव यांना‌ २०२२-२३चा आदर्श ग्रंथापाल पुरस्कार जाहीर 




औसा/ प्रतिनिधी - तालुक्यातील आलमला येथील श्री विवेकानंद वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश जाधव यांना लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणारा 2022-23 चा आदर्श ग्रंथपाल म्हणून दिला जाणारा कै. मारुतीराव चिरके पुरस्कार संघाच्या वतीने जाहीर केला आहे. विवेकानंद वाचनालय आलमला तालुका औसा येथील ग्रंथपाल सुरेश जाधव यांनी आज पर्यंत केलेल्या ग्रंथालयीन सेवेबद्दल व ग्रंथालय चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ,सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे .सुरेश जाधव हे स्वतः बि.ली.प असून गेल्या पंचवीस वर्षापासून विवेकानंद वाचनालय अलमला येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत .त्यांच्या कालावधीमध्ये विवेकानंद वाचनालयाची सर्व क्षेत्रात प्रगती झालेली आहे. आज रोजी वाचनालयामध्ये तीस हजार ग्रंथ असून सर्व अत्याधुनिक सोयीने वाचनालय अत्यंत दर्जेदारपणे ते चालवतात व ग्रंथ प्रेमींना सेवा देण्याचे काम करतात वाचनालयाचा दर्जा ब असून ग्रामीण भागातील एक आदर्श वाचनालय म्हणून या वाचनालयाची ख्याती आहे. आज पर्यंत अनेक मान्यवरांनी या वाचण्याला भेटी देऊन वाचणालयाचा गौरव केला आहे .या पुरस्काराबद्दल ग्रंथपाल सुरेश जाधव यांचे वाचणालयाचे अध्यक्ष भागवत पाटील सचिव प्रभाकर कापसे कोषाध्यक्ष सिद्धलिंग निलंगेकर वाचनाचे सर्व संचालक मंडळ व ग्रंथ प्रेमीं नागरिकांनी व गावातील विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم