जेएसपीएम संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज
असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांचा सत्कार
लातूर -जेएसपीएम संचलित महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक विद्यापीठाअंतर्गत येणार्या महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेजला महाराष्ट्र प्रायव्हेट नर्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार यांनी सदिच्छा भेट दिली असता जेएसपीएम संस्थेच्या सचिव सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, जेएसपीएम संस्थेचे प्रशासकीय सममन्वयक संचालक विनोद जाधव, महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रशासकीय समन्वयक डॉ.शैलेश कचरे, प्राचार्य शिरीन मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रायव्हेट नर्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार यांनी महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेजमधील भौतिक सुविधेबद्दल समाधान व्यक्त करून महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यासह विद्यार्थ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
إرسال تعليق