अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करुन महिला, युवतींना कर्जपुरवठा करा-राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना निवेदन

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करुन महिला, युवतींना कर्जपुरवठा करा-राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना निवेदन

धाराशिव-अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज प्रस्तावामधील काही जाचक अटीमुळे गरजू व्यक्तींना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जाचक अटी रद्द करुन गरजू शेतकरी महिला, युवतींना मोजक्या कागदपत्रांच्या आधारे कमान पाच लाखापर्यंत विनातारण कर्जपुरवठा कर्जपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.


अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे बुधवारी (दि.29) धाराशिव येथे आले असता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ.मनीषा शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येणार्‍या कर्ज प्रस्तावामध्ये काही जाचक अटीमुळे गरजु व्यक्तींना योजनेचा लाभ मिळत नाही. ज्या शेतकरी महिला आहेत व विधवा आहेत अशा महिलांना मोजक्या कागदपत्रांच्या आधारे किमान पाच लाखापर्यंतचा विनातारण कर्जपुरवठा करावा. जेणेकरुन त्या आपल्या पतीच्या पश्चात कुटुंब व मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होतील व भविष्यात महिला उद्योजक तयार होतील.

अनेक मराठा युवक आज उच्चशिक्षण घेऊन बेरोजगार आहेत. अशा उच्चशिक्षित आणि पदवीधर युवकांना नवीन व्यवसायासाठी विनातारण कर्ज देण्यात यावे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महामंडळाच्या कार्यालयामध्ये कर्मचार्‍यांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे कर्ज प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी अनेक अडचणी उद्भवतात. त्यामुळे जिल्हा कार्यालयातील कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्याची शिफारस आपण करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ.मनीषा शिवाजीराव पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सौ.अनिता गरड, धाराशिव तालुका उपाध्यक्ष सुनिता जगदाळे व इतर पदाधिकार्‍यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

أحدث أقدم