अभूतपूर्व जल्लोषात रंगपंचमी--
लातूरच्या सांस्कृतिक परंपरेची जपणूक करा-खासदार सुधाकर शृंगारे यांचे तरुणाईला आवाहन --
-- अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि केतकी माटेगावकर यांची कलरलँड रंगोत्सवात उपस्थिती
लातूर-
लातूरच्या सांस्कृतिक परंपरेची जपणूक करा आणि लातूरचा नावलौकिक आणखी वाढविण्यासाटी शिक्षणाचा प्याटर्न मजबूत करा असे आवाहन स्टारडस्टने आयोजित केलेल्या कलरलँड रंगोत्सवात खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले आहे . या रंगोत्सवाला अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि केतकी माटेगावकर या प्रामुख्याने उपस्थित होत्या . रंगपंचमीच्या शुभेच्छा देत त्यांनी नैसर्गिक रंग खेळण्याचे आवाहन केले . स्टारडस्टच्या माध्यमातुन या रंगोत्सवाचे आयोजन शंकर शृंगारे ,अजित पाटील कव्हेकर आणि प्रेरणा होनराव यांनी केले होते .

लातूर शहरातल्या हॉटेल ग्रँड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कलरलँड रंगोत्सवास अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि केतकी माटेगावकर येणार असल्याने मोठी गर्दी झाली होती . रंगाची उधळण करीत तरुणाई डिजे च्या संगीतावर मंत्रमुग्ध झाली . अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने सैराट चित्रपटातील मधील तिच्या फेमस डॉयलॉगने सुरुवात करीत ," मराठीत कळत नाही ,इंग्लिशमध्ये सांगू ,व्हय लातूरकर " असा संवाद साधला . तर केतकी माटेगावकर हिने तिच्या टाईमपास चित्रपटातील डॉयलॉगने सुरुवात केली . या कार्यक्रमाला महिला ,मुले आणि युवकांनी मोठी गर्दी केली होती .
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक ,खासदार सुधाकर शृंगारे यांनी युवकांशी संवांद साधताना सांस्कृतिक ,कला ,परंपरा यांची जपणूक करा, शिक्षणाचा प्याटर्न वाढवा असे आवाहन केले . खासदार सुधाकर श्रंगारे पुढे म्हणाले कि कोविडच्या काळा नंतर पहिल्यांदाच यावर्षी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत आहेत. संत श्री सेवालाल महाराज जयंती , छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . रंगपंचमीचा मोठा आणि नेत्रदीपक उत्सव आयोजित केल्या बद्दल त्यांनी स्टारडस्टच्या संयोजन समितीचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
إرسال تعليق