रेणापूर येथे 18 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा

 रेणापूर येथे 18 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा

लातूर: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र आणि रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 18 मार्च 2023 रोजी सकाळी दहा वाजता रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव    मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या विभागीय रोजगार मेळाव्यात 12 आस्थापना, उद्योजक यांनी एकूण 593  रिक्त पदे अधिसूचित केली आहेत. यामध्ये पुणे येथील साई श्रद्धा इंटरप्राइजेसमध्ये प्रोडक्शन ऑपरेटरच्या 100 जागांसाठी भरती केली जाणार असून यासाठी आयटीआय (सर्व ट्रेड), पुणे येथीलच टाटा स्ट्रीव्हमध्ये टू व्हिलर ॲन्ड फोर व्हिलर ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियनच्या 50 जागा भरल्या जाणार असून यासाठी इयत्ता दहावी, आयटीआय, इतर अशी पात्रता आहे. तसेच याच आस्थापनेत ऑटोमोटिव्ह कंन्सल्टंट तथा ॲटोमोटिव्ह टेलिकॉलरच्या 50 जागा भरण्यात येणार असून यासाठी इयत्ता बारावी, कोणतीही  पदवी अशी पात्रता राहील.

मुंबई येथील निट लि.मध्ये (आयसीआयसीआय बँक) रिलेशनशिप मॅनेजरच्या  100 जागा भरण्यात येणार असून यासाठी कोणतीही पदवीऔरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशनमध्ये ट्रेनी ऑपरेटरच्या  100 जागांसाठी इयत्ता दहावी, बारावी, एमसीव्हीसी, पदविका किंवा कोणतीही  पदवी अशी पात्रता आहे. मधुरा मायक्रोफायनान्समध्ये ट्रेनी केंद्र मॅनेजरच्या 30 जागा भरण्यात येणार असून यासाठी इयत्ता बारावी, वाहनचालक परवाना अशी पात्रता आहे. लातूर येथील क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि.मध्ये फील्ड ऑफिसरच्या 30 जागांसाठी इयत्ता बारावी, कोणतीही पदवी, तसेच सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि.मध्ये रिलेशनशिप ऑफिसर तथा कलेक्शन ऑफिसरच्या 35 जागांसाठी इयत्ता बारावी, कोणतीही पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

लातूर येथील इक्वीनॉक्स टेक्नोलॉजीमध्ये टेक्निशियन तथा सेल्स पर्सन, सेल्स मॅनेजरच्या 8 जागांसाठी इयत्ता दहावी, बारावी किंवा कोणतीही पदवी, तसेच पुणे येथील डीएसटीए एज्युकेशन फाउंडेशनमधील 10 जागांसाठी इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय (इेलेक्ट्रीशन), लातूर येथील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये शहरी व ग्रामीण करिअर एजंटह्या 50 जागांसाठी इयत्ता दहावी, अकरावी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. दरेकर इव्हेंट प्रा.लि.मध्ये कॉम्पूटर ऑपरेटर, मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, अकाउन्टंटच्या 30 जागांसाठी कोणतीही पदवी तसेच ऑथेंटिक गार्डस इंडीया प्रा.लि.मध्ये सेक्युरिटी गार्डच्या 30 जागांसाठी इयत्ता दहावी, बारावी किंवा कोणतीही पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

या रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी 18 मार्च रोजी सकाळी दहाला रेणापूर येथील शिवाजी महाविदालयातील विभागीय रोजगार मेळाव्याला स्वखर्चाने स्वतःचा रिझ्युमबायोडाटापासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02382- 299462 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाअसे अवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم