महिलांची शक्ती म्हणजे शिक्षण - डॉ श्यामलीला बावगे (जेवळे).

 महिलांची शक्ती म्हणजे  शिक्षण - डॉ श्यामलीला बावगे (जेवळे).   

श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेत जागतिक महिला दिन साजरा . 


औसा : ( प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे,  हि समानता निर्माण करण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे ,महिलांनी फक्त शिक्षणाची सात सोडू नका ,महिलांची शक्ती म्हणजे शिक्षण आहे . असे प्रतिपादन  प्राचार्या डॉ शामलीला बागवे (जेवळे), श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय जागतिक महिला दिना निमित्त ते बोलत होते.                   या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी  हासेगावचे सरपंच सौ शालूबाई राठोड ,  संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, संस्थेच्या उपाध्यक्ष जयदेवी बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे ,  कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, प्राचार्या डॉ शामलीला बागवे(जेवळे),  इत्यादी  मंच्यावर उपस्थित होते.        या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून  मान्यवरांचा सत्कार सोहळा करण्यात आले. महाविद्यालयात मान्यवरांबरोबर फायनल वर्गातील विद्यार्थिनी हि आपले मनोगत व्यक्त केले .  या कार्यक्रमाला  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  विध्यार्थी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी लोहकरे कोमल  केले तर आभारप्रदर्शन  सुप्रिया शेळके यांनी केले .

Post a Comment

أحدث أقدم