साबरमती विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

साबरमती विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा






औसा प्रतिनिधी- साबरमती विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन " उडान " उत्साहात विद्यालयाच्या प्रांगणात साजरे करण्यात आले. या वेळी औसा मतदार संघाचे आ. अभिमन्यू पवार प्रमुख पाहुणे व तसेच माजी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, सुधीर पोतदार यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक मंडळांची कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे व्यवस्थापक मंडळ व प्राचार्यांनी केले. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या विद्यालयाचे व्यवस्थापक संचालक यश बलदवा यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विद्यालयाची जडण-घडण तसेच विद्यालयाच्या भावी वाटचालीविषयी माहिती सखोल माहिती दिली. मान्यवरांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व विद्यालयाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सन.२०२१-२०२२ मधील विदयार्थ्यांचा बक्षीस समारंभ व गुणगौरव सोहळा सर्वसमक्ष प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला. तसेच तालुका जिल्हा व राज्यपातळीवर क्रीडा सत्रात यश संपादन केलेल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, गायन, विनोदी बातम्या, वाचन करून मान्यवरांचे प्रेक्षकांचे मने जिंकली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य सीमा सरोज मॅडम यांनी केले तसेच विद्यालयाच्या मुलांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साबरमती द ग्लोबल विद्यालयाचे व्यवस्थापक संचालक यश बलदवा प्राचार्य सीमा सरोज नृत्य शिक्षक संतोष भस्मे, शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी, पालक, विदयार्थी सिक्युरिटी पथक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि कार्यक्रमाची सांगता "राष्ट्रगीताने" करणायत आली .








Post a Comment

أحدث أقدم