लातूर जिल्ह्यात 13 ते 17 एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचे हवामान विभागाचे संकेत

 लातूर जिल्ह्यात 13 ते 17 एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी

वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचे हवामान विभागाचे संकेत

• नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

लातूर: जिल्ह्यात 13 व 17 एप्रिल 2023 या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहे. या कालावधीत विजा कोसळण्याची शक्यता असल्याने सर्व शेतकरीनागरिक यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

विजांचा कडकडाट सुरु असताना घराबाहेर जाणे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत शेतीची व इतर कामे करु नयेत. या कालावधीमध्ये विजा कोसळण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखालीपाण्याच्या स्त्रोताजवळविद्युत खांबाजवळ बांधू नयेतत्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वत: सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ अथवा नदीजवळ जावू नये, आपल्या मुलांना जलसाठे, नदीवर पोहायला पाठवू नये. शाळा, माविद्यालायाच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे.

पुलावरून अथवा नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. काढणीसाठी ठेवलेली पिके सुरक्षितपणे झाकून ठेवावीत. पाऊस सुरु असताना विजेच्या ताराजुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावीअशा सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच या कालावधीत पोलीस अधिकारीतलाठीमंडळ अधिकारीग्रामसेवककृषि सहाय्यक यांनी आपले मुख्यालय सोडू नयेअसे लातूरचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم