*मुरुड येथे 13 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी समाधान शिबीर*

 *मुरुड येथे 13 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी समाधान शिबीर*


▪️शेतकऱ्यांच्या समस्या व तक्रारींची होणार सोडवणूक 

*लातूर, * महाराजस्व अभियानांतर्गत मुरुड येथील पंचायतराज प्रशिक्षण केंद्रात १३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नागरिक, शेतकऱ्यांच्या तक्रारी, समजून घेवून त्या सोडविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तरी या समाधान शिबिरासाठी मुरुड महसूल मंडळातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लातूरचे तहसीलदार यांनी केले आहे.

समाधान शिबीरासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, लातूरचे तहसिलदार, गट विकास अधिकारी, तसेच सर्व शासकीय विभागांचे तालुका विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या समाधान शिबिरात मुरुड मंडळ विभागातील नागरीकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या व तक्रारी जाणून घेवून त्याची सोडवणूक केली जाणार आहे. तसेच विविध विभागांच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तरी या समाधान शिबिरास मुरुड महसूल मंडळमधील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم