डॉ.बाबासाहेब आंबेडकर ः प्रज्ञावंत व अर्थशास्त्रज्ञ

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर ः प्रज्ञावंत व अर्थशास्त्रज्ञ





श्री रामजी मालोजी सकपाळ हे मान्यवर इंग्रज सरकारच्या सैन्यात सुभेदारपदी कार्यरत असताना मध्यप्रदेशा TVतील इंदोरच्या महू येथील ब्रिटीश सैनिकांच्या वसाहातीत भीमाबाई रामजी सकपाळ या दांपत्याच्या पोटी 1891 च्या 14 एप्रिल रोजी पुत्ररत्न जन्मले. तेच उच्चविद्याविभूषित प्रज्ञावंत व थोर अर्थशास्त्रज्ञ राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ विधीज्ञ विद्वान, विचारवंत, घटनातज्ञ व स्वातंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव परम पुज्य डॉ.भिमराव रामजी आंबेडकर तथा डॉ.बी.आर.आंबेडकर होय. या प्रज्ञावंत महामानवाने विविध योजनेतून अस्पृश्य समाजाला मानवतेचे हक्क मिळवून दिले. त्यांच्या विद्वतापूर्ण नेतृत्वाने दलित समाजात जागृती, आत्मविश्‍वास व स्वाभिमान निर्माण झाला. दलित समाजाला डॉ.आंबेडकर पित्याप्रमाणे वाटू लागले. इतर उच्चवर्णीयात आदरणीय नेते जसे दादासाहेब अण्णासाहेब भाऊसाहेब कााकासाहेब होते तसेच आपलेही हे विद्वान व आदरणीय नेते बाबासाहेब असावेत असं दलित समाजाला वाटल्याने तो समाज त्यांना बाबासाहेब म्हणू लागला. 1933 पासून त्यांचा वाढदिवस साजरा करू लागला 1956 नंतर केंद्र व राज्य सरकारपासून ते देशभर त्यांची जयंती सर्वत्र साजरी केली जाते. त्यांच्याबद्दल परमपूज्य हे अभियान अनायासे मनात येते.
श्री रामजी सकपाळ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरूवातीस ते मायणी येथे व नंतर सातार्‍याला राहात असत. त्यांनी सातार्‍यात भिमरावाला सैनिकी शाळेत दाखल केली. तेथील आंबावाडेकर मास्तरने हजेरी पटावर आपलेच आडनाव भिमरावाचेही करून टाकले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणात आंबावडेकराचे आंबेडकर झाले. श्री रामजी सकपाळ हे सहकुटूंब सहपरिवार सातार्‍याहून स्थलांतरीत होवून मुंबईच्या परळ येथील कामगार चाळीत राहात असत. आई-बापाविना पोरकी व नाबालक असलेल्या रमाबाईशी विवाहबध्द झालेले नाबालक भिमराव आंबेडकर हे मुंबईतून 1907 साली मॅट्रिक पास झाल्याच्या प्रित्यार्थ समाजसुधारक श्री कृष्णराव केळुसकर गुरूजीनी बुध्द चरित्र हे पुस्तक भिमरावाला भेट देवून त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी बडोद्याच्या श्री सयाजीराव गायकवाड महाराजांच्या शिक्षण खात्याकडून शिष्यवृत्ती मंजूर करून दिली. भिमराव आंबेडकर मुंबईच्या एलिफिस्टन महाविद्यालयातून 1912 साली बी.ए.उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांच्या विश्‍वविद्यालयीन शिक्षणासाठी बडोदा नरेशांच्या शिक्षण खात्याकडूनच तीन वर्षासाठी मंजुर झालेल्या शिष्यवृत्तीवर ते 1913 जूनच्या मध्यान्हाला अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले व तेथे त्यांनी एम.ए.अर्थशास्त्रात प्रवेश घेतला.
अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील अर्थशास्त्राचे ज्ञानी प्राध्यापक एडविन सेलिग्मन यांची शोध पध्दत आंबेडकराने अवगत केली. त्यांनी 1915 च्या जूनमध्ये अर्थशास्त्रात एम.ए.ची पदवी संपादन केली व पुढे पी.एच.डी.च्या प्रबंधासाठी वाचन व जुळवाजुळव सुरू केले. प्रा.सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली “हिंदूस्थानचे राष्ट्रीय उत्पन्न एक ऐतिहासिक व चिकित्सक अभ्यास” हा विषय त्यांनी त्यांच्या प्रबंधासाठी निवडला होता. त्यात त्यांनी 1916 साली पी.एच.डी.ही सर्वोच्च पदवी संपादन केली. त्यानंतर डॉ.आंबेडकराने “भारताच्या अधिपत्याखालील प्रांतीक वित्त व्यवस्थेचा विकास” हा प्रबंध लिहिला. हा प्रबंध वाचून प्रा.सेलिग्मन स्तंभित झाले. या प्रबंधाच्या प्रस्तावनेत प्रा.सेलिग्मन म्हणतात “श्री आंबेडकर यांच्या अतिउत्तम प्रबंधामध्ये त्यांनी ज्या विषयाची चिकित्सा केली आहे ती आज जगातील सर्व विभागाचे लक्ष वेधून घेत आहे. आंबेडकरांच्या या योगदानाचे महत्व हे की त्यांच्या देशात ज्या महत्वाच्या घटना घडल्या आहेत त्याची वस्तुनिष्ठ दृष्टीने माहिती गोळा कररून त्याचे त्याने निष्पक्षपणे विश्‍लेषण केले आहे.” त्याने काढलेले निष्कर्ष इतर देशालाही लागू पडतील. माझ्या माहितीप्रमाणे या विषयासंबंधी मुलभूत तत्वाचा इतका तपशीलवार अभ्यास दुसरीकडे कुठे झाला नाही. डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या प्रबंधातून व ग्रंथातून त्यांच्या रोमरोमात भारतनिष्ठाच भरलेली आढळून येते.
एम.एससी(अर्थ) व डी.एससी (अर्थ) हे सर्वोच्च शिक्षणही पूर्ण करण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते. परंतू बडोदा नरेशांच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने त्यांनी इंग्लंड मार्गे भारतात परतण्याचे ठरवून ते लंडनला गेले. त्यांनी आपला प्रबंध सादर करण्यासाठी चार वर्षाची मुदत वाढवून मिळावी म्हणून लंडन विद्यापीठात अर्ज सादर केला व ते भारतात परतले. भारतात त्यांनी मुंबईच्या सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये दीड वर्ष प्राध्यापकाची नौकरी केली. नौकरीतील पैसे व राजर्षी शाहू महाराजाने केलेल्या अर्थसहाय्याने त्यांनी 1920 च्या 5 जून रोजी इंग्लंडला प्रयाण केले व तेथे लंडन विद्यापीठ अंतर्गत असलेल्या “स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिकल सायन्स” या संस्थेत एम.एससी (अर्थ) व डी.एससी(अर्थ) या प्रबंधासाठी प्रवेश घेतला तर कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रॅज्युएशनमध्ये प्रवेश घेतला ते ग्रंथालय उघडतेवेळी ग्रंथालयात जात असत व ग्रंथालय बंद होतेवेळीच ग्रंथालयातून बाहेर पडत असत. त्यांनी खूप वाचन, अध्ययन व साधना केली. त्यांनी 1921 साली अर्थशास्त्रात एम.एससी ही उच्च पदवी संपादन केली व प्रॉब्लेम ऑफ रूपी हा प्रबंध सादर करून 1922 साली डी.एससी ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी संपादन करणारे ते पहिले भारतीय होते. या प्रबंधांची प्रस्तावना लिहिणारे ख्यातनाम प्राध्यापक एडविन कॅनन यांनी डॉ.आंबेडकरांच्या प्रबंधाची प्रशंसा केलेली आहे. ते थोर अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी याचवर्षी बॅरिस्टर ही कायद्याची पदवीही संपादन केली होती. ते 1923 साली माल बोटीने भारतात परतले. त्यांनी मुंबई हायकोर्टात आपल्या वकीली व्यवसायास आरंभ केला. वकीली व्यवसायाबरोबरच ते सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय होते. ते प्रज्ञावंत थोर अर्थशास्त्रज्ञ व कायदातज्ञ तर होतेच त्याचबरोबर ते घटनेचे शिल्पकार आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची 2023 च्या 14 एप्रिल रोजी 133 वी जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त त्या महामानवास भावपूर्ण वंदन व विनम्र अभिवादन!


अभिवादक
सौ.लता युवराज मुमाने
मो.9420212701

Post a Comment

أحدث أقدم