शिवली येथील श्री. हनुमान मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार

 शिवली येथील श्री. हनुमान मंदिराच्या

सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार

हनुमान मंदिर यात्रेच्‍या सांगता कार्यक्रमात आ. रमेशआप्पा कराड यांची ग्वाही





 

          लातूर- लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भादा सर्कल मधील मौजे शिवली येथील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली.

            शिवली येथील जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिराच्या यात्रेची सांगता सोमवारी झाली. या सांगता कार्यक्रमास भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी आवर्जून भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांचा ग्रामस्थांनी यथोचित सत्कार करून मंदिर परिसराच्या विकासाची मागणी केली. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन आ. रमेशआप्पा कराड यांनी भाविकांच्या आणि गावकऱ्यांच्या सोयीसाठी मंदिरासमोरील प्रांगणात सभागृह, मूलभूत सोयी सुविधा यासह सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून आवश्यक तेवढा निधी आणून विकास कामे केली जातील.

           शिवली येथील श्री हनुमान विद्यालयाच्या नियोजित विस्तारित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते झाला. श्री हनुमान विद्यालयात उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी याकरिता आपण निश्चितपणे शासन दरबारी प्रयत्न करू त्याचबरोबर विद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी जे जे शक्य असेल त्याकरिता आपण मदत करू अशी ग्वाही आ. कराड यांनी यावेळी आयोजित जाहीर कार्यक्रमातून बोलताना दिली. प्रारंभी शिक्षण संस्थेच्या वतीने आ. रमेशआप्पा कराड यांचा सत्कार करून स्वागत केले. आमदार निधीतून शिवली गावात झालेल्या रस्त्याच्या कामाची आ. कराड यांनी यावेळी पाहणी केली.

          शिवली गावात आ. रमेशआप्पा कराड यांचे आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी करून वाजत गाजत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि जल्लोषात ग्रामस्थांनी स्वागत केले. मंदिर आणि विद्यालय या दोन्ही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे यांच्यासह भाजपाचे पद्माकर चिंचोलकरसोमनाथआप्पा पावलेगुणवंत करंडेसरपंच सुधाकर खर्गेचेअरमन दिनेश लेनेकरमनसेचे शिवकुमार नागराळेशिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ, विजयकुमार जाधवसचिव मोहनराव साळुंखेराजकिरण साठेरवींद्र पाटीलसतीश कात्रेमहादेव मुळेउद्धव काळेवाजिद पठाणराम पटणेअक्षय भोसलेअच्युत इरपेबालाजी शिंदेगोविंद क्षीरसागरकिशोर इरपेरुद्रआप्पा पावलेसूर्यकांत काळेसुधाकर पाटीलशिवलिंग पावलेशिवकंठ मोहिते यांच्यासह शिवली आणि परिसरातील सर्व स्तरातील नागरिक महिला पुरुष भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم