श्री केशवराज संकुलात महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत संवाद बैठक

 श्री केशवराज संकुलात महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत संवाद बैठक

लातूर/प्रतिनिधी:येथील श्री केशवराज संकुलात महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती )अंतर्गत महिला संवाद बैठक संपन्न झाली.
    बैठकीच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा समितीच्या बौद्धिक प्रमुख तथा भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या श्रीमती शुभदा देशमुख तर प्रमुख पाहुण्या म्हणून केंद्रीय कार्यकारिणी सदस्या श्रीमती वर्षाताई मुंडे,विशाखा समिती अध्यक्षा श्रीमती मनीषा टाेपरे,केशव शिशु वाटिका अध्यक्ष श्रीमती वर्षा डोईफोडे,(प्राथमिक शालेय समिती अध्यक्ष श्रीमती योगिनी खरे यांची मंचावर उपस्थिती होती.  
   श्रीमती वर्षाताई मुंडे म्हणाल्या की,विशाखा समितीची स्थापना एका वेगळ्या उद्देशाने करण्यात आली.मुलींच्या,महिलांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांचे निवारण योग्य मार्गदर्शनाद्वारे विशाखा समिती करते.मुलींच्या समस्या योग्य पद्धतीने निवारण करणे ही काळाची गरज आहे. समस्या कळण्यासाठी संवादाची अत्यंत आवश्यकता आहे. अनुभव व ऊर्जा यांची सांगड घालून समस्या निर्माण होणारच नाही याकडे लक्ष देता येईल
यासाठी भावना जागृत असली पाहिजे.मोठ्यांनी छोट्यांची दखल घेणे म्हणजेच छोट्यांच्या  मानसिक बदलाची सुरुवात असते.दुसऱ्यांना समजून घेण्याआधी मी स्वतः स्वतःला समजणे अत्यंत गरजेचे आहे,असे त्या म्हणाल्या.
     अँड.श्रीमती मीरा देवणीकर यांनी विशाखा समितीविषयी सखोल मार्गदर्शन केले.श्रीमती शुभदाताई देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगतात भारतीय शिक्षण प्रसारक  संस्थेतील ध्येयधोरणा संबंधीची माहिती दिली.स्त्री ही अष्टभुजा देवीचे रूप आहे, हे फक्त म्हणण्यापुरते  नसून ते कृतीतही उतरवता आाले पाहिजे.महिला शिक्षकांनी आपल्या विद्यार्थी,विद्यार्थिनी सोबत प्रेमळ,मायाळू,आपुलकीचे संबंध ठेवून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण केली पाहिजे असे त्या म्हणाल्या. 
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत श्रीमती इंदू ठाकूर यांनी केले. सूत्रसंचलन व आभार श्रीमती तेजस्विनी सांजेकर यांनी मानले.श्रीमती कांचन तोडकर यांच्या कल्याण मंत्राने  बैठकीची सांगता झाली.
    या बैठकीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी,
उपमुख्याध्यापक तथा विद्यासभा संयोजक महेश कस्तुरे,पर्यवेक्षक संदीप देशमुख,बबन गायकवाड, दिलीप चव्हाण,विशाखा समितीच्या सर्व सदस्य,सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم