लोकनेते दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम.निराधार संघर्ष समिती

 लोकनेते दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम.निराधार संघर्ष समिती

औसा : सहकार महर्षी मा. दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त औसा येथील श्री केशव बालाजी मंदिर येथे फळांच्या आराशीसह दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप व ग्रामिण अर्थक्रांतीचे शिल्पकार माजी मंत्री मा. दिलीपरावजी देशमुख  साहेब यांच्या जिवन पटावर प्रकाश टाकणाऱ्या खुल्या निबंध स्पर्धचे निराधार संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 18/04/2023  रोजी आयोजन करण्यात आलेले आहे.
    लातूर जिल्ह्याचे सुपूत्र माजी मंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अग्रही भूमीका घेणारे राज्यात शैक्षणिक क्रांतीसाठी लातूर पॅटर्न म्हणून लातूरची अनोखी ओळख मिळवून देणारे व सांस्कृतीक, धार्मिक, क्रिडा, ऐतिहासीक वास्तूंची जपणुक अशा कितीतरी छोट्या मोठ्या बाबींनवरती बारकाईने लक्ष ठेऊन संवर्धन करणारे नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व अशा विविध बिरूदावलीने नटलेल्या अभिव्यक्तीस त्यांच्या वाढदिवसानिमीत्त अभिष्टचिंतन करावे आणि समाजातला अत्यंत दुर्लक्षीत घटक अर्थात दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन वेगळा वाढदिवस साजरा करून दिव्यांगांना उपयोगी साहित्याचे मोफत वाटप करावे व चळवळीचा पाठीराखा अर्थात दिलीपरावजी या विषयावर निबंध लेखन व्हावे हा निर्णय निराधार संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेला आहे. त्यासाठी आपला लिखीत स्वरूपात निबंध व दिव्यांगांनी आपली नाव नोंदणी सागर सेवा केंद्र, ग्रामिण रुग्णालयाच्या शेजारी औसा येथे येत्या 15 एप्रील पर्यंत करावी.
    या वाढदिवसानिमित्त दिव्यांगाना श्री केशव बालाजी देवस्थान औसा येथे 18 एप्रील रोजी सायंकाळी 4 वाजता साहित्य वाटप व सर्वातकृष्ठ निबंधास 11,000/- रू रोख रक्कम बक्षीसाच्या स्वरूपात दिली जाणार असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रक काढून निराधार संघर्ष समितीचे राजेंद्र मोरे व राजीव कसबे यांनी दिलेली आहे.

Post a Comment

أحدث أقدم