बीटीएस परीक्षेत सृष्टी श्रीमंगले राज्यातून द्वितीय

 बीटीएस परीक्षेत सृष्टी श्रीमंगले राज्यातून द्वितीय

लातूर /प्रतिनिधी:श्री केशवराज विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकणारी सृष्टी मनोज श्रीमंगले या विद्यार्थिनीने बी.टी.एस. ज्युनिअर आय.ए.एस कॉम्पिटेशन स्पर्धा परीक्षेत राज्यातून द्वितीय येण्याचा मान मिळवला.
       शाळेत बीटीएस परीक्षेच्या वर्षभर नियमित जादा तासिका तसेच सराव परीक्षा घेण्यात आल्या.अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून या विद्यार्थिनीने हे यश मिळवले.
    यशस्वी विद्यार्थिनी व तिला मार्गदर्शन करणाऱ्या धनंजय कुलकर्णी,श्रीमती करुणा गायकवाड,श्रीमती मेघा सूर्यवंशी, शुभम पाटील,लक्ष्मण गिराम या शिक्षकांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अलुरकर,उपाध्यक्ष जितेश चापसी,कार्यवाह हेमंत वैद्य, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण सरदेशमुख,संजय गुरव,स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष धनंजय तुंगीकर,स्थानिक समन्वय समिती कार्यवाह तथा शालेय समिती अध्यक्ष (माध्यमिक) शैलेश कुलकर्णी,केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, विद्यासभा संयोजक तथा उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, पर्यवेक्षक संदीप देशमुख,दिलीप चव्हाण,बबन गायकवाड,श्रीमती अंजली निर्मळे,बी.टी.एस.प्रमुख शरद माळी,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم