शहर काँग्रेस कमिटीचा प्रथम पुरस्कार सिद्धार्थ सोसायटी जयंती उत्सव मंडळास प्रदान
लातूर : प्रतिनिधी-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने लातूर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात भव्य मिरवणुका, देखावे, नृत्य आणि विविध कला गुण दर्शनाचे प्रदर्शन केले जाते. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक विचारातून समाज जागृतीचा संदेश दिला जातो. त्याकरिता लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षी आकर्षक बक्षीस व रोख रक्कम दिली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२२ चा शहर काँग्रेसच्या वतीने दिला जाणारा प्रथम पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समित-२२ सिद्धार्थ सोसायटी, लातूर यांना शहर जिल्हा अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रवीण कांबळे, बाबासाहेब गायकवाड, प्रवीण सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, लक्ष्मण कांबळे, प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक इनोस मोमीन, जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष आशाताई चिकटे, सचिव मंगलताई सुरवसे, अर्चना जाधव, सुनंदाताई कटारे, सोसायटी चेअरमन विठ्ठल जाधव, संचालक प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे, डॉ. मा. ना. गायकवाड यांची उपस्थिती होती. या निमित्ताने जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सिद्धार्थ सोसायटीच्या सर्व यांच्या वतीने जयंती कमिटी २०२२ च्या सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
إرسال تعليق