२०२६ पर्यंत लातूर जिल्हा बँकेला टॉप फाईव्हमध्ये नेणार

 २०२६ पर्यंत लातूर जिल्हा बँकेला टॉप फाईव्हमध्ये नेणार

लातूर : प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्यात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्हा सहकारी बँकांच्या बरोबरीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काम करीत आहे. सन २०२६ पर्यंत लातूर जिल्हा बँकेस टॉप फाईव्हमध्ये नेण्याचे उद्दिष्ट ठेवले असून तो पुर्ण करणार असल्याचा निर्धार बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत चेअरमन आमदार धिरज देशमुख बोलत होते. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. प्रमोद जाधव, संचालक अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, अशोकराव गोविंदपूरकर, पृ्थ्वीराज सिरसाट, दिलीप पाटील नागराळकर, मोरोती पांडे, राजकुमार पाटील, एन. आर. पाटील, संचालिका अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक एच. जे. जाधव आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा बँकेचा सद्य:स्थितीत ७ हजार ३३६ कोटींचा व्यवसाय असून ३८०० कोटींचे डिपॉझिट आह. त्यामुळे सन २०२६ पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा व्यवसाय १० हजार कोटींपर्यंत नेण्याचे नियोजन आहे, असे नमूद करुन चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख पुढे म्हणाले, जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी बँक म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे.

शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणण्यासाठी बँक पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देत आहे. शेतकरी पाल्यांच्या शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करुन देत आहे. या योजनेतून ३५६ शेतकरी पाल्यांना १० कोटी ४७ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच शेतक-यांच्या मुलींसाठी शुभमंगल योजनेंतर्गत ३ हजार ८०० कुटूंबांना लाभ दिला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह १२२ शाखा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देत आहे. भविष्याचा वेध घेवुन जिल्ह्यातील नेत्यांच्य्साा मार्गदर्शनातून सहजता, सुलभता व तत्परता या तिन्ही पद्धतीच्या माध्यमातून नवनवीन योजना सक्षमपणे राबवून सभासदांमध्ये बँकेची विश्वासर्हता निर्माण केलेली आहे. बँकेतील एकुण ठेवी व येणेबाकीचा विचार करता ७३३६. ४४ कोटी मार्च २०२३ अखेर टर्न ओव्हर टप्पा पार करणारी व ८००० कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल करणारी राज्यातील अग्रणी बँक आहे.

लोकनेते विलासराव देशमुख शेतकरी व्याज परतावा योजनेचा लाभ ७७२९० शेतक-यांना
शेतक-यांची गरज लक्षात घेऊन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा बँकेने लोकनेते विलासराव देशमुख शेतकरी व्याज परतावा योजना सक्षमपणे स्वनिधीतून राबवलेली आहे. सदर योजनेत पुर्वीची पीक कर्जाची मर्यादा ३ लाखावरुन ५ लाख केलेली आहे. राज्यात पहिली व एकमेव ही योजना राबविणारी अग्रणी बँक आहे. या विकासाभिमूख योजनेंतगर्त २०१६-१७ ते २०२२-२३ या सात वर्षांत ७७२९० लाभार्थी शेतक-यांना ८५८.०० लाख रक्कमेचा व्याज परताव्याचा लाभ स्वनिधीतून दिलेला आहे, असे चेअरमन आमदार धिरज देशमुख म्हणाले.

१७८० कोटींचे पीककर्ज वाटप
पीक कर्ज वाटपासंदर्भात चेअरमन आमदार धिरज देशमुख म्हणाले, शासनाने वेळोवेळीचे जाहीर केलेल्या कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ योजनेतून एकुण २४११८३ लाभार्थ्यांना एकुण ५८०.०३ कोटी रक्कमेचा लाभ प्राप्त झालेला आहे. शासनाचे कर्जमाफी पोर्टलवर बँकेमार्फत विशेष बैठक व्यवस्था बसवून सर्व कर्ज माफीचे प्रस्ताव दाखल केलेले आहेहत. त्यापैकी १३२३० लाभार्थ्यांचे अंदाजीत ३६ कोटी लाभ मिळणे बाकी आहे. कर्जमाफी योजनेत व प्रोत्साहनपर लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना बँकेमार्फत कर्ज धोरणानूसार पुन:श्च कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. आजतारखेवर बँकेने पीक कर्जापोटी १७८० कोटींचे कर्ज वाटप केलेले आहे.

Post a Comment

أحدث أقدم