वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये लातूरच्या नोटबूक चित्राकृतीची नोंद

 वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये लातूरच्या नोटबूक चित्राकृतीची नोंद






लातूर : प्रतिनिधी-

 शहरातल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर पार्कवर ११ हजार चौरस फूट जागेवर बाबासाहेबांचे भव्यदिव्य चित्र नोटबुक्स म्हणजे वह्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. हि चित्राकृती साकारताना साधारण १८ हजार नोटबुक्सचा वापर करण्यात आला आहे. ११ हजार चौरस फूट जागेवर नोटबुक्सने उभारण्यात आलेली हि देशातील पहिलीच चित्राकृती आहे. त्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियानेदेखील या चित्राची नोंद घेतली आहे. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून हे चित्र साकारण्यात आले आहे. त्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने त्यांच्या नावाचीही नोंद घेत विक्रम स्थापित केल्याचे प्रमाणपत्र दिले आहे .

अर्टिस्ट चेतन राऊत आणि त्यांच्या इतर १८ कलाकारांनी मिळून हे चित्र तीन दिवसात साकारले आहे . ११,१२ आणि १३ एप्रिल रोजी हे चित्र लातूरकरांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. ११ हजार चौरस फुट जागेवर साकारण्यात आलेली हे चित्राकृती पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांना अभूतपूर्व पद्धतीने अभिवादन करण्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून हे भव्य चित्र साकारण्यात आले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे मुख्य संपादक पवन सोलंकी यांनी या चित्राची विक्रमी नोंद झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे .

नोट्बुकच्या माध्यमातून मोझ्याक पद्धतीने साकारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील हे पहिलेच चित्र आहे. ११ हजार चौरस फूट जागेवर रंगीत नोटबुक्स वापरुन हे चित्र साकारण्यात आले आहे. हे चित्र पाहता यावे किंवा या चित्रा सोबत सेल्फी घेता यावी, यासाठी मोठा उंच रॅम्पही या ठिकाणी उभारण्यात आला आहे. एका वेळी दहा लोक सेल्फी घेऊ शकतील असा हा रॅम्प आहे. काल मंगळवारपासून नागरिकांसाठी हे चित्र खुले करण्यात आले आहे, तर आज आणि उद्या हे चित्र नागिरकांसाठी खुले असणार आहे. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री तोफांची सलामी देऊन हे चित्र काढण्यात येईल. या चित्राकृतीसाठी वापरण्यात आलेल्या नोट बुक्स या लातूर लोकसभा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणा-या गरजू मुलांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत.

या चित्राला चारही बाजूने कंपाउंड करून सुरक्षित करण्यात आले आहे ,याशिवाय नागरिकांना हे चित्र स्पष्ट दिसावे यासाठी एलईडी वॉलदेखील लावण्यात आले आहे. दिवसा सूर्यप्रकाशात हे चित्र वेगळे दिसते आहे तर संध्याकाळी लाईट्सच्या इफेक्टमध्ये हे चित्र आणखीनच लक्षवेधी दिसते आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या चित्राला पाहण्यासाठी यावे, असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांच्या वतीने करण्यात आले आहे. हे चित्र पूर्ण करण्यासाठी आयोजकांच्या वतीने स्टारडस्ट ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत. या चित्राकृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होते आहे.

१८ हजार नोटबुक्स आणि २० कलाकारांनी साकारले भव्य चित्र
अर्टिस्ट चेतन राऊत आणि त्यांच्या इतर १८ कलाकारांनी मिळून हे चित्र ३ दिवसांत १८ हजार नोटबुक्सच्या सहायाने साकारले आहे. ११, १२ आणि १३ एप्रिल रोजी हे चित्र लातूरकरांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. २ दिवसांत हजारो नागरिकांनी ही चित्रकृती पाहून चित्रकृती साकारणा-या कलावंतांचे कौतुक केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم