आ. रमेशआप्पा कराड यांच्‍या नेतृत्‍वात निघालेल्‍या सावरकर गौरव यात्रेने रेणापूरकरांचे लक्ष वेधून घेतले

 आ. रमेशआप्पा कराड यांच्‍या नेतृत्‍वात निघालेल्‍या

सावरकर गौरव यात्रेने रेणापूरकरांचे लक्ष वेधून घेतले

       लातूर दि.०७ -  स्वातंत्र्य आणि सुराज्य स्थापनेसाठी अथक परिश्रम घेणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गौरव यात्रा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या नेतृत्‍वाखाली रेणापूर येथे गुरूवारी सायंकाळी मोठया उत्‍साहाच्‍या आणि देशभक्‍तीमय वातावरणात काढण्‍यात आली. वाजत गाजत प्रचंड प्रतिसादात निघालेल्‍या या गौरव योत्रेने रेणापूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते. यात्रेत महिलांचा सहभाग लक्षणिय होता.

          स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अवमान केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम सावरकर प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदार संघातून सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. समाजसुधारकविज्ञाननिष्ठ राष्ट्रभक्तहिंदू संघटकस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी यासाठी रेणापूर येथे काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही गौरव यात्रा चांदणी चौकबसवेश्‍वर चौकएकुर्गे गल्‍लीपोस्‍ट ऑफीसयलम गल्‍ली मार्गे रेणापूरचे ग्रामदैवत आदीशक्‍ती श्री. रेणूकादेवी मंदिराच्‍या समोरील प्रांगणात समारोप झाला.

          या गौरव यात्रेत महिला पुरुषासह भारत माता की जयवंदे मातरमअमर रहे अमर रहे सावरकर अमर रहे यासह विविध घोषणा देत तरुणांनी मोठा सहभाग घेतला होता. अनेकांच्या डोक्यावरील भगव्या टोप्यागळयातील भगवे गमचेभगवे आणि भाजपा पक्षाचे झेंडेविविध घोषवाक्‍य लिहलेली फलक रेणापूरकरांचे लक्ष वेधून घेत होते. ढोल ताशाच्या गजरातभजनी मंडळाच्‍या आणि आराधी मंडळाच्‍या  भक्‍तीमय वातावरणात निघालेल्‍या या गौरव यात्रेत महिलांची संख्‍या लक्षणीय होती.

         रेणापूर शहरात निघालेल्या या गौरव यात्रेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्यासह भाजपाचे जिल्हा उपाध्‍यक्ष गोविंद नरहारेविजय काळेचंद्रसेन लोंढेभाजपाचे लातूर ग्रामीण अध्‍यक्ष अनिल भिसेतालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदेरेणापूरचे पहिले नगराध्‍यक्ष अभिषेक आकनगिरेरेणापूर  तालुका संगायो अध्यक्ष वसंत करमुडेमाजी उपसभापती अनंत चव्‍हाणकुलदिप सुर्यवंशीभाजपाचे महेंद्र गोडभरलेभागवत गितेश्रीकृष्‍ण पवारशरद दरेकरसिध्‍देश्‍वर मामडगेविठ्ठल कसपटेशिवाजी उपाडेउज्‍वल कांबळेदत्‍ता सरवदेश्रीकृष्‍ण मोटेगावकररमाकांत फुलारीअनंत सरवदेमाधव घुलेनामदेव बोंबडेशिवमुर्ती उरगुंडेकिशन क्षीरसागररमेश कटकेसंजय डोंगरे,  शेख अजिमअंतराम चव्‍हाणलखन आवळेमहेश गाडेउत्‍तम चव्‍हाणराजू आलापूरेशिवाजी सोमवंशीमारूती गालफाडेविजय गंभिरेधनंजय पवारविजय चव्‍हाणललिता कांबळेशिला आचार्यअनुसया फडगणेश तुरूपगणेश चव्‍हाणबालाजी फडनामदेव गोडभरलेप्रल्‍हाद फुलारीत्र्यंबक भतानेबबन डोंगरेनंदूमहाराज कुलकर्णीअजित पाटीलराजकुमार मानमोडेप्रमोद कुटवाडअॅड. श्रीगीरेअॅड. सुधाकर बोराडेदिलीप चव्‍हाणनरसिंग येलगटेदत्‍ता उगीलेधम्‍मानंद घोडकेअच्‍युत कातळेरमेश चव्‍हाणहणमंत भालेरावविरेंद्र चव्‍हाणपाटलोबा मुंडेअजित गायकवाडदत्‍ता अंबेकरप्रकाश गालफाडेदिनकर राठोडसदाशिव राठोडश्रीमंत नागरगोजेसचिन सिरसकरयोगेश राठोडलक्ष्‍मण खलंग्रेभिमराव मुंडेगोविंद राजेपप्‍पू कुडकेओम चव्‍हाणगोविंद पनगुलेप्रकाश जाधवबबन भतानेदिगंबर येडलेगणेश माळेगावकरजगन्‍नाथ कातळेकारभारी चव्‍हाणसंतोष राठोड,  प्रताप भुरेरमेश वरवटेरफीक शिकलकरभरत कापसेकार्तीक गंभीरेदिपक पवारसंजय चव्‍हाणप्रभाकर डोंगरेनंदकुमार मोटेगावकरबाळू पाटील,, विश्‍वनाथ गाडेखलील ताशेवालेसुरज फुलारीरोहीत खुमसेव्‍यंकट आकनगिरेभारत राठोडमनोज चक्रेशरद चक्रेमजहर शेखसमिर शेखसोपान सातपुते यांच्यासह सर्वसाधारण नागरिक महिला पुरुष तरुण आदीनी सहभाग घेतला होता.

Post a Comment

أحدث أقدم