एस व्ही एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा

 एस व्ही एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा





   महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक रौप्यमहोत्सवाच्या औचित्य साधून विद्यापीठाने सर्व मेडिकल कॉलेजना जागतिक आरोग्य दिनानिमित्त अवयव दान याचे महत्व सामान्य लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सांगितले होते, त्यापैकी एस व्ही एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले  तसेच अवयव दान या विषयाबद्दल पोस्टर आणि घोषवाक्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली तसेच भव्य रॅलीचे उद्घाटन एमआयटी कॉलेज लातूरचे प्रमुख डॉ. मंत्री मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. 
     सोबत संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे कोषाध्यक्ष शिवलिंग जवळे,सचिव वेताळेश्वर बावगे,प्राचार्य डॉ.विरेंद्र मेश्राम, प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला, मुख्याध्यापक कालिदास गोरे  प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم