समनक जनता पार्टीच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन- दिलीप आडे
धाराशिव : ( प्रतिनिधी) लोकशाहीच्या बळकटीसाठी समनक जनता पार्टीच्या लोकार्पण सोहळ्याला धाराशिव जिल्ह्यातील गोर बंजारा समाजानी दि.९ एप्रिल २०२३ रोजी माहूरगड येथे होणार आहे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष या प्रा. संपत चव्हाण यांनी केले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महान न तपस्वी योगानंद महाराज यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र विकास आघाडीचे ऍड. अण्णाराव पाटील हे राहणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्षे झाली असून कुठल्याच राजकीय पक्षांनी अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांना अपेक्षित न्याय दिला नाही, या लोकांवरील अन्याय अत्याचार वाढत असून या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळवण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी, लोकशाही बळकटीसाठी समनक जनता पार्टीची स्थापना करण्यात आली असून ९ एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथे ऐतिहासिक लोकार्पण सोहळा सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. तरी या ऐतिहासिक लोकापर्ण सोहळ्याला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. चव्हाण यांनी केले आहे. प्रा. चव्हाण यांनी गेली २० वर्षे सामाजिक संघटनेच्या मार्फत उपेक्षितांच्या हक्कासाठी लाक्षष्णिक उपोषणे, रास्ता रोको विराट मोर्चा, जेलभरो असे विविध आंदोलने त्यांनी आजपर्यंत केलेली आहे. त्यामुळे आता राजकारणात येण्याची घोषणा प्रा. चव्हाण यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली असून समनक जनता पार्टी या नव्या पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार असल्याचे देखील चव्हाण यांनी म्हटले आहे. या नव्या पक्षाचा प्रभाव आगामी निवडणुकीत निश्चित दिसून येईल असा अंदाज राजकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाप्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांची उपस्थिती लाभणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बालाजी राठोड, दिलीप आडे यांनी केले आहे.
إرسال تعليق