अतिक्रमनमुक्‍त शेतरस्ते व शिवरस्ते होणार मोकळे -अविनाश कांबळे

 अतिक्रमनमुक्‍त शेतरस्ते व शिवरस्ते होणार मोकळे -अविनाश कांबळे





लातूर दि.07-04-2023
रेणापूर तालुक्यातील पळशी गाव व परिसरातील शेतरस्ते, अतिक्रमणमुक्‍त व्हावीत तसेच शिवरस्तेही मोकळे व्हावीत यासाठी महसूल विभागाच्यावतीने महाराजस्व अभियान सुरू करण्यात आलेले आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाअंतर्गत येणारे विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यासह अतिक्रमणमुक्‍त शेतरस्ते व शिवरस्ते आता मोकळे होणार आहेत असे प्रतिपादन रेणापूर व औसा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी केले.
यावेळी ते महसूल विभागाच्या महाराजस्व अभियान-2023 अंतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला रेणापूरच्या तहसिलदार धम्मप्रिया गायकवाड, लखमापूरचे सरपंच अ‍ॅड.रमेश खाडप, पळशीच्या सरपंच भंडारेताई, उपसरपंच दशरथ जाधव, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तथा प्रसिध्द उद्योजक उध्दवराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, शासनाच्या या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून गावागावातील तंटे मिटणार आहेत. शासनाच्या मध्यस्तीने गावागावातील शेतरस्ते व शिवरस्ते पूर्णपणे अतिक्रमणमुक्‍त होणार आहेत. शासनाने राबविलेल्या या उपक्रमाला लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी योग्य ते सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्याहस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.  यावेळी या कार्यक्रमाला संतोष कदम, प्रगतशील शेतकरी, जग्गनाथ जाधव, विश्‍वनाथ जाधव, वाल्मिक गव्हाणे, महेश जाधव, नवनाथ जाधव, यांच्यासह दवणगाव, खानापूर, ईटी आदी गावचे सोसायटी चेअरमन, पोलीस पाटील व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

أحدث أقدم