क्रांतिसूर्य महात्मा फुले हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते-माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख

 क्रांतिसूर्य महात्मा फुले हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते-माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख

लातूर : प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी त्या काळात शैक्षणीक क्षेत्रात काम केले असे नाही तर त्यांनी समाजकारण राजकारनात कार्य करत दुर्लक्षित समाजाला न्याय देण्याचे कार्य करणारे हे क्रांतिसूर्य महात्मा फुले हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे, असे बहुमोल विचार राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी मंगळवारी येथे बोलताना व्यक्त केले.क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी ते अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, माजी आमदार अ‍ॅड. त्रिंबक भिसे, साखर संघाचे आबासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष भारत काळे, माळी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा सार्वजनिक जयंती महोत्सव समिती चे संस्थापक अध्यक्ष पद्माकर वाघमारे, संघाचे सचिव जगदीश माळी, अनिता फुटाणे, सावता फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले, सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष सुपर्ण जगताप, हरिराम कुलकर्णी, सचिन दाताळ, प्रवीण सुर्यवंशी, प्राचार्य एकनाथ पाटील, संभाजी रेड्डी, मधूकर गुंजकर, संतोष माळी शिवाजी कांबळे नेताजी बादाडे, शैला बलुतकर, संगीता क्षीरसागर, अ‍ॅड. बालाजी गाडेकर, संतोष माळी सुरेंद्र तिडके, रामदास साळुंखे, सावता फुटाणे, अंगद पवळे, पांडुरंग माळी, दयानंद झांबरे प्राचार्य माळी, राजाभाऊ वाघमारे, सौ विद्याताई गाजरे, माया गोरे, सुदाम राउत आदी समाजबांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन उगले यांनी मांडले.

Post a Comment

أحدث أقدم