शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी माजी आमदार रोहिदास चव्हाण

  शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी माजी आमदार रोहिदास चव्हाण






लातूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लातूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी लोहा-कंधारचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून ही निवड जाहीर करण्यात आली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील रोहिदास चव्हाण यांनी 1986 ते 1996 मध्ये दहा वर्षे शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर 1995 व 1999 च्या विधानसभेत लोहा-कंधारचे आमदार म्हणून काम पाहिले. त्यानंतर 2004 ते 2009 या कालावधीत परत शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले. ह्या सर्व कामाची पावती म्हणून तसेच संघटना बांधणीसाठी पक्ष वाढीसाठी पहिल्यांदाच ग्रामीण भागातील नेतृत्व असलेले, जनसामान्याची नाळ असलेल्या माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची निवड पक्षाने केली आहे. ह्या निवडीचे लातूर जिल्ह्यातील शिवसैनिकांतून जोरदार स्वागत होत आहे.यांच्या निवडी बद्दल महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी, शिवसेना औसा तालुका प्रमुख सतीश शिंदे, औसा बाजार समिती उपसभापती किशोर जाधव, उपतालुकाप्रमुख श्रीधर सांळुके यांनी लोहा येथे सत्कार केला.

Post a Comment

أحدث أقدم