काँग्रेसचे उमेश बेद्रे यांच्यासह अनेकजण
आ. कराड यांच्या उपस्थितीत भाजपात
लातूर - लातूर तालुक्यातील मौजे भातखेडा येथील सरपंच तथा काँग्रेसचे कार्यकर्ते विकास साखर कारखान्याची माजी संचालक उमेश बेद्रे यांच्यासह अनेकांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
देशात पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी राज्यात उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी गोरगरीब सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून अनेक योजना सुरू केल्या. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती दिली. त्याचबरोबर लातूर ग्रामीण मध्ये आ. रमेशआप्पा कराड यांनी गावागावात वाडी तांड्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणला. भाजपाच्या माध्यमातून होत असलेल्या कामाची दखल घेऊन भातखेडा येथील सरपंच उमेश बेद्रे यांच्यासह अनेकांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, बाबू हनुमंतराव खंदाडे, दीपक वांगस्कर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे उमेश बेद्रे यांच्यासह भातखेडा येथील ग्रामपंचायत व सोसायटीचे सदस्य रमाकांत नकाते, धनराज मुमाने, सचिन वैद्य, रजाक पठाण, हरिदास उपळकर, शिवाजी बारमुळे, रसूल शेख, युवराज माने, विजय सावंत, नागराज बेद्रे, धनराज पाटील, गणपत बेद्रे, बाळू बेद्रे यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
إرسال تعليق