आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून ३२ ग्रामपंचायतींना जनसुविधा अंतर्गत ३ कोटी २० लक्ष रूपयाचा निधी मंजूर

 आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून ३२ ग्रामपंचायतींना

जनसुविधा अंतर्गत ३ कोटी २० लक्ष रूपयाचा निधी मंजूर

लातूर - जिल्‍हा वार्षीक योजनेतून जनसुविधेसाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ३२ गावच्‍या ग्रामपंचायती अंतर्गत विविध ४५ कामासाठी तब्‍बल ३ कोटी २० लक्ष रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. सदरील निधी मंजूर झाल्‍याने त्‍या त्‍या गावातील भाजपाच्‍या लोकप्रतिनिधीपक्ष पदाधिकारीकार्यकर्त्‍यासह नागरीकांनी आ. कराड यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

जिल्‍हयाचे पालकमंत्री मा. गिरीशजी महाजन साहेब यांच्‍या माध्‍यमातून जिल्‍हा वार्षीक योजने अंतर्गत ग्रामपंचायतीला जनसुविधेसाठी विशेष अनुदान या योजनेतून भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील लातूर तालुक्‍यातील २२ गावात ३१ कामासाठी २ कोटी १८ लक्ष रूपयेरेणापूर तालुक्‍यातील ८ गावातील ११ कामासाठी ८३ लक्ष रूपये आणि भादा सर्कल मधील २ गावातील ३ कामासाठी १८ लक्ष रूपये याप्रमाणे एकूण ३ कोटी १९ लक्ष ८५ हजार रूपये इतका निधी मंजूर झाला आहे.

मंजूर झालेल्‍या गावात लातूर तालुक्‍यात सोनवती पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता तयार करणे दोन कामासाठी १० लक्षसोनवती स्‍मशानभूमी संरक्षण भिंत सुशोभिकरण व सौर विद्युतीकरण ७ लक्ष ५० हजारसावरगाव पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे दोन कामे १६ लक्षशिवणी खु. पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ५ लक्षभिसे वाघोली सिमेंट रस्‍ता करणे आणि नाली बांधकाम दोन कामे १५ लक्ष,  रूई दिंडेगाव पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ३ लक्षयेळी आरओ फील्‍टर व शेड बांधकाम करणे ५ लक्ष रूपयेमसला पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ७ लक्षभातखेडा सिमेंट कॉक्रीट रस्‍ता करणेपेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणेसिमेंट नाली करणे तीन कामे २२ लक्षभातांगळी सिमेंट रस्‍ता करणे ७ लक्षभाडगाव पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ९ लक्षभडी पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ७ लक्ष ५० हजारनिवळी पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ९ लक्ष ७५ हजारदगडवाडी स्‍मशानभूमी शेड बांधकाम करणे व सुशोभिकरण ९ लक्षचिंचोली (ब.) नाथ मंदिर चौक पेव्‍हर ब्‍लॉक करणे आणि सिमेंट रस्‍ता दोन कामासाठी १४ लक्षजेवळी नवीन वस्‍तीत नाली बांधकाम करणे आणि स्‍मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रस्‍ता करणे दोन कामे १० लक्षजवळा बु. स्‍मशानभूमी परिसर विकसीत करणे ७ लक्षचिखुर्डा दलित वस्‍ती स्‍मशानभुमी शेड बांधकाम करणे ४ लक्ष २५ हजारगातेगाव पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ९ लक्ष ७५ हजारकारसा ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे आणि पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता व नाली करणे दोन कामे १७ लक्षखुलगापूर ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे १० लक्षकासार जवळा सिमेंट रस्‍ता करणे ७ लक्ष ५० हजारकाटगाव सार्वजनिक स्‍मशानभूमी परीसर विकसीत करणे ७ लक्षरेणापूर तालुक्‍यात हारवाडी पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ७ लक्षसांगवी पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ५ लक्ष रामवाडी पा. सिमेंट रस्‍ता व नाली बांधकाम दोन कामे १७ लक्षमोटेगाव पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ७ लक्षपानगाव सिमेंट रस्‍ता करणे आणि मातंग समाज स्‍मशानीभूमी विकसीत करणे १७ लक्षगव्‍हाण ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे आणि सिमेंट रस्‍ता करणे दोन कामे १७ लक्षखरोळा सिमेंट रस्‍ता  करणे ७ लक्षईटी सिमेंट रस्‍ता करणे ७ लक्ष ५० हजारभादा सर्कल मधील भेटा पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे आणि स्‍मशानभूमी संरक्षण भिंत बांधकाम व सुशोभिकरण दोन कामासाठी ११ लक्षबिरवली सिमेंट रस्‍ता करणे ७ लक्ष याप्रमाणे निधी मंजूर झाला आहे.

सदरील ग्रामपंचायतीना निधी मंजूर झाल्‍याबद्दल भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांचे त्‍या त्‍या गावातील भाजपाचे पदाधिकारीलोकप्रतिनिधीकार्यकर्तेसरपंच यांच्‍यासह नागरीकांच्‍या वतीने आभार व्‍यक्‍त केले आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात वाडी तांडयात शासनाच्‍या विविध योजनेच्‍या माध्‍यमातून विकास कामे व्‍हावी यासाठी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा  कराड यांनी वेळोवेळी सातत्‍याने विविध विभागामार्फत प्रयत्‍न केले. केलेल्‍या प्रयत्‍नामुळे आतापर्यंत कोटयावधी रूपये खर्चाची अनेक कामे मंजूर झाली आहेत. त्‍यासाठी लागणारा निधीही उपलब्‍ध झाला आहे. यामुळे मतदार संघातील गावागावात आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या बाबतीत कार्यसम्राट आमदार कामगिरी दमदार असेच बोलले जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم