भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त लातूर शहरातील रस्ते वाहतुकीत बदल

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त लातूर शहरातील रस्ते वाहतुकीत बदल

लातूर - भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त लातुर शहरात दिनांक 13 एप्रिल,2023 रोजी मोटार सायकल रॅली व दिनांक 14 एप्रिल,2023 रोजी जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार असून विविध जयंती समिती व संघटनेतर्फे वाजत गाजत मिरवणुका काढत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क, टाऊन हॉल, लातूर येथील मैदानावर मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्र येतो व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयास मानवंदनेच्या वेळी रस्त्यावर दुतर्फा गर्दी होते. त्यामुळे रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती लातूर महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.

जनतेच्या सोईच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने लातूर शहरातील खालील मार्गावर वाहतुक बंद करणे व वाहतुक वळविणे आवश्यक असल्‍याने दि. 13 एप्रिल,2023  रोजी सकाळी 09.00 ते रात्री 14.00 वाजेपर्यंत आणि दि. 14 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11-00 ते रात्री 23-00 वाजे पर्यंत खालील मार्गावरील वाहतुक बंद करण्‍यात / वळविण्‍यात येत आहे.

 दि. 13 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9-00 ते रात्री 14-00 वाजेपर्यंत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने मोटार सायकल रॅलीनिमीत्‍त बंद असणारे मार्ग.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉल - छत्रपती शिवाजी महाराज चौक - पाण्याची टाकी (संविधान चौक) परत छत्रपती शिवाजी महाराज चौक - राजीव गांधी चौक - म.बश्वेश्वर चौक - गरुड चौक - स्‍वामी विवेकानंद चौक - त्रपती शाहु चौक गंजगोलाई - सराफ लाईन मार्गे गांधी चौक ते टाऊन हॉल हा मार्ग (मोटार सायकल, थ्रीव्हीलर, एस.टी.बसेस, ट्रक, टॅम्पो, टॅक्सी, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर,इ.),वाहतुकीसाठीबंद राहील.

दि. 14 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11-00 ते रात्री 23-00 वाजेपर्यंत भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकामुळे वाहतुकीसाठी बंद असणारे मार्ग.पी.व्ही.आर चौक ते एक नंबर कॉर्नर, पाण्याची टाकी (संविधान चौक), दयानंद गेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशोक हॉटेल मार्गे टाऊन हॉल व जुना रेणापूर नाका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशोक हॉटेल मार्ग टाऊन हॉल व तसेच गरुड चौक ते गाव भागातील मिरवणुका गंजगोलाई, मुख्य बसस्थानक, मिनी मार्केट मार्गे टाऊन हॉल हे मार्ग हे सर्व प्रकारच्या वाहनांना (मोटार सायकल, थ्री व्हीलर, एस.टी.बसेस ट्रक, टॅम्पो, टॅक्सी,  ट्रॅव्हल्स, मिनीडोअर  इ.) वाहतुकीसाठी बंद राहतील.

दि. 14 एप्रिल, 2023 सकाळी 11-00 तेरात्री 23-00 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग  पी.व्ही.आर चौकातून शिवाजी चौक व शहरात येणारे एस. टी. बसेस पी.व्ही.आर.चौकातून रिंगरोडने नवीन रेणापुर नाका मार्गे जुना रेणापुर नाका येथील बसस्टॅन्डचा वापर करतील. बाकी सर्व वाहने रेणापूर नाकाकडे किंवा खाडगाव टी-पॉइटमार्गे वाडा हॉटेल किंवा खाडगाव टी पॉइट ,                             साईधाम, आशियाना बंगला, जुना औसा रोड याचा वापर करतील.

औसा रोडने शहरात येणा¬या एस.टी.बसेस या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील बसडेपोचा वापर करतील. तसेच चार चाकी,तीन चाकी व दोन चाकी वाहने जुना औसा रोडवरुन आशियाना बंगला, साई धाम मार्गे खाडगाव टी पॉर्इंट किंवा नाईक चौक मार्गे सुतमील रोड या मार्गाचा वापर करतील.

अंबाजोगाई रोडने लातूर शहरात येणा¬या एस.टी.बसेस जुना रेणापुर नाका येथिल बसस्थानकाचाच वापर करतील. अंबाजोगाई रोडने येणारी चार चाकी, तीन चाकी व दोन चाकी वाहने ही सिध्देश्वर मंदिराकडील रोड मार्गे गरुड चौकाकडे किंवा गाव भागात जातील व तसेच जुना रेणापुर नाका येथून बालाजी मंदीर या मार्गाचा वापर करतील.

नांदेड रोडने शहरात येणाऱ्या एस.टी.बसेस या गरुड चौक .सिद्धेश्वर चौकनविन रेणापुर नाका मार्गे जुना रेणापुर नाका येथिल बसस्थानकाचा वापर करतील. नांदेड रोडने येणारे ट्रक, चार चाकी, तीन चाकी व दोन चाकी वाहने ही सिध्देश्वर मंदिराकडील रोड मार्गे नविन रेणापूर नाका, रेल्वे स्टेशन मार्गे पीव्हिआर चौक या मार्गाचा वापर करतील किंवा गरुड चौक, बाभळगाव नाका, बश्वेवश्वर चौक मार्गे राजीव गांधी चौक या मार्गाचा वापर करतील.

शहरातील वाहतुकीसाठी नागरीकांनी  1) राजस्थान विद्यालय ते संमातर रोडने बेद्रे कॉम्पलेक्सच्या पाठीमागून औसा रोड, आशियाना बंगला - खाडगाव रोड ते रिंगरोडचा मार्गाचा वापर करावा   2)गांधी चौक ते बस्वेश्वर महाविद्यालय - रमा चित्रपटगृह - खोरी गल्ली - शिवनेरी लॉज अशा मार्गाचाच अवलंब करावा. जुना रेणापुर नाका बसस्थानक येथे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व बसेस परत त्याच मार्गे रिंग रोडने जातील.

  तरीसर्व नागरीकांनी दि. 13 एप्रिल,2023 रोजी सकाळी 9-00 ते रात्री 14-00 वाजेपर्यंत आणि दि. 14 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11-00  ते रात्री 23-00 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असलेल्‍या मार्गावर वाहनांचा वापर टाळावा व पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे.

Post a Comment

أحدث أقدم