रूपाली बोराडे पाटील यांना बेस्ट ड्रेस डिझायनर अवार्ड
लातूर : प्रतिनिधी
फॅशन डिझायनर रूपाली अजय बोराडे – पाटील यांना नुकताच ‘बेस्ट डिझायनर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. लातूरमध्ये पहिल्यांदाच सूर्या नेत्रा फाउंडेशनचा ब्युटी एक्सपो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटमध्ये सूर्या यांच्या मॉडेलसाठी रूपाली पाटील यांनी ड्रेस डिझाईन केला होता. तो ड्रेस १०० मीटर असून २०१८ मधील कान्स फेस्टिवल मधील सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री दीपिका पदुकोन यांनी परिधान केला होता. या ड्रेस सारखाच हुबेहूब ड्रेस इतरांच्या मदतीने रूपाली पाटील यांनी २ दिवसांत तयार केला.
إرسال تعليق