कृषी निविष्ठांच्या अडचणी निराकरणासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना
लातूर : कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने खरीप हंगामात येणाऱ्या अडचणीचे तत्काळ निराकरण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये कार्यरत राहील. या कक्षाचा संपर्क क्रमांक (भ्रमणध्वनी) 8446117500 तसेच टोल फ्री क्रमांक 18002334000 असा आहे. त्याचबरोबर contralroom.qc.maharashtra@
विभागस्तरावर सुध्दा संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून विभागीय कृषी सहसंचालक, लातूर कार्यालयाचे तंत्र अधिकारी(गुण नियंत्रण) पी.व्ही.भोर(मोबाईल क्रमांक 7972428581), विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एस. एच. मोरे (मोबाईल क्रमांक 9422409786), कनिष्ठ लिपिक एल. आय. कदम (मोबाईल क्रमांक 9890970419) सदर कक्षाचे संनियंत्रण करणार आहेत. निविष्ठांच्या उपलब्धतेबाबत तसेच अडचणी व तक्रारीबाबत वरील संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे लातूरचे, विभागीय कृषी सहसंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
إرسال تعليق