व्हाईस ऑफ मिडीयाच्या मराठवाडा कार्यवाहकपदी बाळासाहेब जाधव यांची वर्णी

 व्हाईस ऑफ मिडीयाच्या मराठवाडा कार्यवाहकपदी बाळासाहेब जाधव यांची वर्णी

लातूर-पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी काम करणार्‍या व्हाईस ऑफ मिडीया या संघटनेची मराठवाडा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून व्हाईस ऑफ मिडीयाच्या मराठवाडा कार्यवाहकपदी बाळासाहेब जाधव यांची वर्णी लागलेली आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्हे, 48 तालुक्यातून 26500 पेक्षा जास्त पत्रकार सदस्यांनी व्हाईस ऑफ मिडीया या संघटनेशी आपले नाते जोडलेले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सभासद संख्य असणारी व्हाईस ऑफ मिडीया ही मराठवाड्यातील एकमेव संघटना झाली आहे. या संघटेत मराठवाड्याचे कार्यवाहक म्हणून बाळासाहेब जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांची ही निवड मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांनी केली आहे. यामध्ये लातूर येथील मराठवाडा सरचिटणीसपदी पत्रकार संगम कोटलवार यांची तर संघटकपदी सचिन चांडक यांचीही निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल व्हाईस ऑफ मिडीयाचे लातूर जिल्हाध्यक्ष बालाजी फड, कार्यवाहक शहाजी पवार, हणमंत गायकवाड, सुशांत सागावे, अनिल पुरी, प्रा.विनोद चव्हाण, योगीराज पिसाळ, आंनद माने यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांनी अभिनंदन केले.  

Post a Comment

أحدث أقدم