शिक्षक भरतीत खुल्या व आर्थिक दुर्बल घटकांच्या जागा आरक्षण नियमाप्रमाणे भराव्यात-अभियोग्यताधारक शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात

 शिक्षक भरतीत खुल्या व आर्थिक दुर्बल घटकांच्या जागा आरक्षण नियमाप्रमाणे भराव्यात-अभियोग्यताधारक शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात

 

लातूर / प्रतिनिधी-नव्याने होणाऱ्या 34000 शिक्षक भरती मध्ये खुल्या प्रवर्गासाठी 38 टक्के व आर्थिक दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षणाच्या नियमांनुसार जागा भराव्यात अशी मागणी अभियोग्यता धारक शिक्षकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनामार्फत गुरुवारी केली आहे..

 

शिक्षकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की 2017 मध्ये झालेल्या शिक्षक भरती मध्ये खुल्या प्रवर्गासाठी 5000 पैकी जेमतेम 46 जागा आल्या होत्या. अर्थातच या जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या  38 टक्के च्या आसपास सुध्दा नव्हत्या. तसेच आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण असूनही या प्रवर्गासाठी जेमतेम टक्केच जागा आल्या होत्या.  त्यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर खूप अन्याय झाला होता. नंतर एसइबीसी आरक्षण रद्द झाले. अगोदरच या प्रवर्गास कुठल्याही सवलती नसतात. त्यातही जास्त मार्क्स घ्यावे लागतात आणि जास्त मार्क्स घेऊन सुध्दा आपल्या हिश्श्याच्या जागा या प्रवर्गासाठी येत नाहीत. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत नाही. हा आमच्यावर झालेला खूप मोठा अन्याय आहे. आता 2023 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरती मध्ये 2017 ची पुनरावृत्ती होऊ नयेतसेच आमच्यावर यावेळी तरी अन्याय होऊ नये  म्हणून आपण जातीने लक्ष घालून खुल्या प्रवर्गासाठी 38 टक्के जागा आणि आर्थिक दुर्बल प्रवर्गासाठी 10 टक्के जागा ज्या नियमानुसार आहेत तेवढ्या याव्यात यासाठी प्रयत्न करावे.  

 

अनेक वर्षानंतर शिक्षक भरती होत असल्याने सर्व विद्यार्थी आशेने भरतीची वाट पाहत आहेत. सर्व अभियोग्याता धारक गरीब विद्यार्थ्याचा आशेचा किरण बनून मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर आमची मागणी शिक्षणमंत्री साहेबांकडे मांडावी अशी विनंती ही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळामध्ये सौदागर भिसेरामकिसन मायंदेबजरंग जाधवमहादेव बोरफळेगजानन जोशीविनोद चव्हाणअशोक जाधवआकाश बिडवेअझर शेख,  समीर शेख आदींचा समावेश होता.

Post a Comment

أحدث أقدم