गारकर यांची कविता स्त्री व उपेक्षितांना लढण्याचे बळ देते-प्रा.डॉ.रणजित जाधव

  गारकर यांची कविता स्त्री व उपेक्षितांना 

लढण्याचे बळ देते-प्रा.डॉ.रणजित जाधव





लातूर- पुरुषप्रधान समाज व्यवस्थेमुळे स्त्री ही भारतीय समाजामध्ये हजारो वर्षांपासून उपेक्षित व दुय्यम दर्जाचे जीवन जगत असून आता महिलांनी या प्रवृत्ती विरुद्ध लढण्याची हिंमत ठेवावी लागेल तरच भयमुक्त व सन्मानजनक जीवन जगता येईल असे मत महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक व समीक्षक प्रा.डॉ.रणजित जाधव यांनी कवी गोविंद गारकर लिखित मरख हिम्मत लडने की
 या हिंदी काव्यसंग्रहाच्या  5 एप्रिल रोजी केसरीनंदन फंक्शन हॉल संविधान चौक लातूर येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले.
               या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी व उर्दू गझलकार मा.अजय पांडे बेवक्त होते तर मराठवाडा साहित्य परिषदेचे लातूर जिल्हा अध्यक्ष मा.प्रा.डॉ.जयद्रथ जाधव उदघाटक होते.कवी योगिराज माने व प्रा.नयन राजमाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
            या प्रसंगी डॉ.जयद्रथ जाधव यांनी साहित्य हे मूल्यांचा विचार असून ते जीवनभाष्य असते.वर्तमान अमानुष वृत्ती-प्रवृत्तीवर प्रहार करत संविधान मूल्यांचे रक्षण करण्याचे विचार कवी या काव्यसंग्रहातून मांडतो असे मत त्यांनी मांडले.तर प्रा.नयन राजमानेंनी   कवीने आपल्या कवितेतून स्त्री समस्या मांडून तिच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे स्त्री हितकारक काम केले आहे असे म्हटले.तर कवी योगिराज माने यांनी गोविंद गारकर हे कवितेतून प्रखर वास्तव समस्या मांडताना उत्कृष्ट श्रृंगार रस कविता ही तोलामोलाची लिहितात असे गौरवोद्गार काढत पुढील लेखन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
        आपल्या अध्यक्षीय समारोपात गोविंद गारकर यांच्या कवितेचे कौतुक करताना सुप्रसिद्ध मराठी व उर्दू गझलकार अजय पांडे बेवक़्त म्हणाले की, त्यांची कविता ही आपल्या शिक्षक धर्माला जागून अनेक सामाजिक व राष्ट्रीय समस्यांवर अत्यंत सोप्या भाषेत सदुपदेशपर भाष्य करताना दिसते.त्याचबरोबर जुन्या पिढीतील हिंदी गीतकारांचा आदर्श समोर असल्यामुळे प्रेमरसपूर्ण गेय कविताही या संग्रहात वाचायला मिळतात. कवीच्या स्वभावातील साधेपणा , प्रामाणिकता यांची छाप त्यांच्या रचनेवर उमटलेली दिसते.
        या कार्यक्रमाला प्रा.शिवाजी जवळगेकर,कवी विशाल अंधारे, गौरचे सरपंच विठ्ठल टोकले,माजी सरपंच ज्ञानोबा चामे, पांडूरंग गारकर, अमोल भुरे,दत्ता माने,नीता कदम,भागवत घारुळे,अ‍ॅड.उदय दाभाडे ,विजय कदम,  शिक्षक,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक संघटनांचे
अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
        या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोपान शिंदे,संजय गारकर,माधव शिंदे,ज्ञानदेव शिंदे यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक संयोजक व कवी गोविंद गारकर यांनी केले.आभार दगडू गारकर यांनी मानले व सुत्रसंचलन प्रा.मीना घुमे यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم