देशहिताला व विकासाला गती देण्यासाठी कुटुंबनियोजनावर कठोर नियंत्रणाची गरज - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 देशहिताला व विकासाला गती देण्यासाठी कुटुंबनियोजनावर कठोर नियंत्रणाची गरज - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर-भारत आणि चीन यांच्यातील स्पर्धा सर्वांनाच माहीत आहे. संयुक्‍त राष्ट्र लोकसंख्या निधीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 2.9 दशलक्षाने जास्त झाली आहे. युएनएफपीए ने द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट-2023 मध्ये प्रकाशीत केलेला आहे. याची ताजी आकडेवारी “डेमोग्राफीक इंडिकेटर्स” या श्रेणीमध्ये देण्यात आलेली आहे. एवढ्या वर्षात पहिल्यांदा चीनला भारताने मागे टाकले आहे. यामध्ये भारताची लोकसंख्या 142.86 कोटी आहे तर चीनची लोकसंख्या 142.57 कोटीवर गेली असल्याचे समोर आले आहे. परंतु यामध्ये 1980 पेक्षा लोकसख्या वाढीचा दर कमी असल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामुळे देशविकासाला गती मिळण्याऐवजी विकासाची गती मंदावण्याचे काम होणार आहे. त्यामुळे देशहिताला अन् विकासाला गती देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कुटुंबनियोजनावर कठोर नियंत्रण लावण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली.
भारत हा तरूणांचा देश म्हटला जात आहे. एकूण लोकसंख्येपैकी 0 ते 14 वर्ष वयोगटाचा एकूण लोकसंख्येतील वाटा 25 टक्के, 10 ते 19 वर्ष वयोगटातील लोकसंख्येचा वाटा 18 टक्के , 10 ते 24 वयोगटातील लोकसंख्येचा वाटा 26 टक्के, 15 ते 64 वर्ष वयोगटातील लोकसख्येंचा वाटा 68 टक्के तर 65 वर्ष वयोगटातील लोकसंख्येचा वाटा 07 टक्के आहे. याऊलट चीनचे आहे. चीनमध्ये 65 वर्ष वयोगटावरील लोकांचा लोकसंख्येतील वाटा 14 टक्के , 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्येचा वाटा 17 टक्के, 10 ते 19 वयोगटाचा लोकसंख्येतील वाटा 12 टक्के व 15 ते 64 वर्ष वयोगटातील लोकसंख्येचा वाटा 69 टक्क्यावर गेलेला आहे.
भारत हा एक शक्‍तीशाली देश आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत भारत सातत्याने पुढे जात आहे. तरीही चीनपेक्षा 30 लाख लोकसंख्या भारतामध्ये जास्तीची असल्याचे समोर आलेले आहे. या लोकसंख्यावाढीमुळे विकासाची गती मंदावण्याचे काम काही प्रमाणात होत आहे. त्यामुळे विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लोकसंख्या नियंत्रणाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाल्यास विकासालाही गती मिळेल आणि भारताचे जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही असा विश्‍वास माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला.

Post a Comment

أحدث أقدم