जागृती शुगर कडून २०० रुपयाचा हप्ता उस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर जमा

 जागृती शुगर कडून २०० रुपयाचा हप्ता उस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर जमा

लातूर : प्रतिनिधी
जागृती शेतक-यांची प्रगती या ब्रीदवाक्या प्रमाणे मराठवाडा व विदर्भ राज्यात खाजगी साखर कारखानदारीत अव्वल स्थानावर असलेल्या उस उत्पादक शेतक-यांना एफआरपी पेक्षा अधिक भाव देणा-या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्याने चालु गाळप हंगामात ६ लाख ३२ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून आजतागायत चालु हंगामात १५१ कोटी ६८ लाख २४० रुपये शेतक-यांना अदा केली आहेत. मांजरा साखर परिवाराच्या धोरणानुसार चालु हंगामात २ हजार २०० रूपये मेट्रिक टन प्रमाणे पहिल्या हप्तापोटी १३९ कोटी ४ लाख २२० रूपये तर दुसरा हप्ता २०० रुपये प्रमाणे १२ कोटी ६४ लाख असे एकूण १५१ कोटी ६८ लाख २४० रुपये शेतक-यांना अदा केले आहेत. यामुळे देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, चाकुर, उदगीर, लातूर, औसा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एकेकाळी उजाड माळरान असलेल्या व गेल्या दहा वर्षांपासून शेतक-यांच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या तळेगाव येथील जागृती शुगरने पहिल्या गळीत हंगामापासून शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अधिक भाव देण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे या भागातील शेतक-यांचा आर्थिक विकास बघायला मिळत आहे. शेती सुधारली उसाचे क्षेत्र वाढले माजी मंत्री कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ११ वर्षात कारखान्याने अतिशय काटेकोर पणे नियोजन करून उस उत्पादक शेतक-यांना झुकते माप देण्याचे काम जागृती शुगरच्या संचालक मंडळाने केले असून यापुढेही करण्याचा निश्चितच प्रयत्न करू अशी माहिती जागृती शुगरच्या अध्यक्षा सौ गौरवी भोसले देशमुख यावेळी बोलताना सांगितले.जागृती शुगर कारखान्याकडून चालु गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतक-यांना दुस-या हप्त्याची रक्कम २०० रूपये उसाच्या प्रति मेट्रिक टन पोटी १२ कोटी ६४ लाख रुपये खात्यावर वर्ग केले आहेत. चालु गळीत हंगामात उस देणा-या सभासदांनी खात्यावरील रक्कम घ्यावी, असे आवाहन जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, सरव्यवस्थापक गणेश येवले, संचालक मंडळ यांनी केले आहे..

Post a Comment

أحدث أقدم