श्री रामनाथचा विद्यालयाचा बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 96.66 टक्के

श्री रामनाथचा विद्यालयाचा बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 96.66 टक्के

आलमला:- श्री रामनाथ उच्च माध्यमिक विद्यालय, आलमला येथील फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल 96.66 टक्के लागला असून, त्यात कला  विभागातून कु.जाधव नंदिनी दिनकर 85.5% घेऊन महाविद्यालयातून सर्व प्रथम, तर कु. कांबळे दिव्या लालासाहेब 76% द्वितीय, आणि कु. पटेल सादिया जावेद ही 72.67% गुण घेऊन तृतीय आली आहे. तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातून इलेक्ट्रिकल  टेक्नॉलॉजीचा चि. लोखंडे शंभू गुरुनाथ 72.50% घेऊन सर्वप्रथम तर, कु. शेख जैनब मो.  सलीम ही 71.83% घेऊन द्वितीय आली आहे. तसेच ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मधून चि. सूर्यवंशी अजय दादाराव प्रथम, पीकशास्त्र या व्यवसाय अभ्यासक्रमांमधून कु. पवार जयश्री शिवाजी ही प्रथम आली आहे. कला विभागातून  विशेष प्राविण्यात 2 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 5 विद्यार्थी,  तर द्वितीय श्रेणीत एकूण 19 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांमधून एकूण 26 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 32 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. उमेश पाटील, उपाध्यक्ष शिवाजीराव अंबुलगे, सचिव  प्रभाकर कापसे, सहसचिव  नंदकुमार धाराशिवे, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाच्या प्राचार्या 
 सौ. अनिता पाटील, पर्यवेक्षक  पी. सी.पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم