स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचे प्रश्न शासनाकडे मांडण्यासाठी मी कटिबद्ध - आ.अभिमन्यु पवार

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचे प्रश्न शासनाकडे मांडण्यासाठी  मी कटिबद्ध - आ.अभिमन्यु पवार

     ‌
औसा- किल्लारी येथे सौ.मीना हरिदास मिरकले पाटील फौंडेशन पुणे किल्लारी व दत्तोबा भोसले संरक्षण प्रशिक्षण प्रबोधिनी मातोळा,श्री निलकंठेश्वर मंदिर संस्था आणि स्वातंत्र्य सैनिक पाल्य समिती किल्लारी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा गौरव करताना आ. पवार म्हणाले की 'स्वातंत्र्य सैनिक पाल्यांच्या काही महत्त्वाच्या प्रश्नाला शासन दरबारी मांडुन त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करण्याचे अभिवचन देतो.निमित्त होते स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांचा गौरव,परिसंवाद आणि कमलाकर रामराव सावंत यांनी लिहिलेल्या 'क्रांतिभुमी व क्रांतिकारकांच्या कथा'या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाचे.
त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते विवेकानंद दत्तोबा भोसले, प्रसिद्ध व्यवसाय तज्ञ औरंगाबाद, प्रमुख पाहुणे होते. बुवासाहेब उर्फ यशवंतराव जाधव चिलवडीकर, डॉ. हनुमंत किणीकर प्रसिद्ध मणका व मेंदू विकार तज्ञ, लातुर , महेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, सतीश पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी औसा, सुरेंद्र पाटील, ग्रामीण साहित्यीक,सुभाष जाधव भाजपा तालुकाध्यक्ष औसा तथा सामाजिक कार्यकर्ते , हरिदास मिरकले पाटील व लेखक कमलाकर सावंत.
सर्वप्रथम स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून व सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली गेली.त्यानंतर कमलाकर सावंत लिखित स्वातंत्र्य सैनिक गौरव ग्रंथ 'क्रांतिभुमी व क्रांतिकारकांच्या कथा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.त्या नंतर उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा सपत्नीक गौरव करताना आला. आधुनिक विचारांच्या क्रांतीकारकांच्या सुरेंद्र पाटील यांनी प्रकाशित ग्रंथाची ओळख करून दिली. महेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.लेखक सावंत पुस्तक लेखना मागची प्रेरणा सांगितली.
डॉ.पंडित किल्लारीकर यांनी स्वातंत्र्य सैनिक पाल्य गौरव मुर्तींच्या वतीने मनोगत मांडले.सौ.जयश्री संभाजी पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश भोसले यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवहर आकुसकर, सीसीआरटी नवी दिल्लीचे समन्वयक, पंढरी उमाटे, शिवाजी भोसले,पवन भोसले,आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यातील साठ स्वातंत्र्य सैनिक पाल्यासह अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होती.

Post a Comment

أحدث أقدم