लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालय चा निकालात मुलींची बाजी


लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालय चा निकालात मुलींची बाजी

     औसा/प्रतिनिधी -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड अंतर्गत घेण्यात आलेल्या पदवी हिवाळी परीक्षा २०२३ चा प्रथम सेमिस्टर चा निकाल जाहीर झाला असून श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर महाविद्यालयाचा अतिशय चांगला निकाल लागला आहे. विशेष प्राविण्यासह विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, प्रथम क्रमांक श्रुती  जोगदंड ८२.२२% (८.८५ SGPA), द्वितीय क्रमांक योगिता पाटील  ७९.४०%(८.५२ SGPA) व तृतीय क्रमांक दत्ताहरी कोटमोड  ७६.८८%(८.२८ SGPA)या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, सचिव वेताळेश्वर बावगे, संचालक नंदकिशोर बावगे, प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला  प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे, आणि कादर शेख, अतुल कदम, शेख शबनम, सुप्रिया जाधव, शिवानी कौलखेरे, जेबा अन्सारी, मनकरना कराळे, महेश्वरी भोगे, तसेच लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव, राजीव गांधी इन्स्टिट्यूट हासेगाव ,एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजीओथेरपी, लातूर कॉलेज ऑफ आयटीआय, लातूर कॉलेज ऑफ सायन्स, ज्ञानसागर विद्यालय ,गुरुनाथ आप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल या सर्व प्राचार्याने   अभिनंदन व पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم