एकदिवसीय साहित्य संमेलन संपन्न
लातूर(प्रतिनिधी): ज्येष्ठ साहित्यिक जी.जी. कांबळे- विद्यार्थी व मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेला अमृत महोत्सव व एकदिवसीय साहित्य संमेलन मोठ्या थाटामाटात ,रामचंद्र बलदवा सभागृह ज्ञानेश्वर विद्यालय शाहू चौक लातूर या ठिकाणी पार पडले. यावेळी पार पडलेल्या सकाळच्या सत्रात जेष्ठ साहित्यिक, कथाकथनकार माननीय कांबळे सर अमृत महोत्सव वर्षानिमित्त त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी विचार पिठावर अध्यक्ष म्हणून अॅडवोकेट मनोहरराव गोमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्राचार्य सोमनाथ रोडे सर जेष्ठ साहित्यिक डॉक्टर भास्कर बडे, मसाप लातूर शाखाध्यक्ष डॉक्टर जयद्रथ जाधव, प्राचार्य दुष्यंत कटारे, संस्था उपाध्यक्ष प्रल्हादराव दुडीले ,सविता कांबळे ,प्राध्यापक गौतम गायकवाड ,विश्वास मोमले इत्यादी जण उपस्थित होते.याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे सर यानी ,जी.जी. कांबळे हे ध्येयवादाने, निर्मळ ,स्वच्छ जीवन जगले .विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी सातत्याने सफुपुलिंग जागवला. समन्वयवादी आंबेडकर विचार प्रवाहाची ते धार बनले , ते हे शांत निखळ जीवन प्रवास करणारे ,समाज प्रिय ,विद्यार्थी घडविणारे एकआदर्श शिक्षक आहेत. त्यानी जगण्यातून आंबेडकरी अनुयायी असल्याचे दाखवून दिले आहे.असा मुक्तकंठ त्यांचा गौरव केला. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर बडे ,डॉ. जयद्रथ जाधव ,प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे ,संस्था उपाध्यक्ष दुडीले, प्रा.गौतम गायकवाड ,विश्वास मोमले मुंबई यांनीही यावेळी आपले समयोचित विचार मांडले ,तर या कार्यक्रमाचे अध्यक्षिय समारोप एडवोकेट मनोहर गोमारे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र सूर्यवंशी यांनी केले. दुसर्या सत्रात थोर साहित्यिक सतीश सुरवसे यांनी -अंधश्रद्धा ,जी जी कांबळे सर यांनी -दोन दोस्त ,ज्येष्ठ साहित्यिक भास्कर बडे यांनी -लुगड्याची गोष्ट, प्रसिद्ध कथाकार अंबादास केदार यानी- जोगवा ,ही कथा यावेळी सादर केली आणि या कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप करीत असताना परिवर्तनवादी ,आंबेडकरवादी विचार घेऊन जी जीकांबळे सर यांनी आपल्या साहित्याची सुरुवात केली, असा त्यांनी कांबळे सरांचा गौरवही केला.
तर तिसर्या सत्रात कवी संमेलन पार पडले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कवी भारत सातपुते हे यावेळी उपस्थित होते .याप्रसंगी योगीराज माने ,नागनाथ कलवले, नरसिंग इंगळे, नयन राजमाने ,वृषाली पाटील, पंडित कांबळे ,प्रदीप कांबळे, दत्ता वालेकर, संगपाल कांबळे ,छगन घोडके ,प्रकाश घादगिने, शंकर झुले ,रामदास केदार, रामकृष्ण बैले, रामदास कांबळे, उषा भोसले, मेनका धुमाळे, रमेश हनुमंते, दत्ता प्रसाद झंवर, प्रीतम कांबळे, दिलीप गायकवाड, रसूल पठाण इत्यादींनी आपल्या कविता मुक्तहस्ते सादर केल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड भोसले, अशोक सुतार, राहुल कांबळे, निजामुद्दीन कासार, राजेगावकर यांनी विशेष प्रयत्न केले.
إرسال تعليق