मुकुंदराज उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

 मुकुंदराज उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश


 

लातूर– माध्यमिक व उच्च्‍ माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत नांदगाव (ता. लातूर) येथील माईर एमआयटी पुणे संचलित मुकुंदराज उच्च माध्यमिक विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. बारावीची एकूण 88 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 85 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा 98 टक्के तर कला शाखेचा 94.73 टक्के निकाल लागला आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत मुकुंदराज उच्च माध्यमिक विद्यालयातील 85 विद्यार्थ्यांपैकी 03 विद्यार्थी विषेश प्राविण्यासह व 56 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 26 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेत कु. चिगुरे पुजा अनिल (73.33 टक्के) प्रथम, कु. सुर्यवंशी मुक्ता श्रीपती (71 टक्के) व्दितीय तर चि. बंडे निशांत वसंत याने (70 टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

तसेच कला शाखेतून कु. पवार वैष्णवी अनिल (81.5 टक्के) - प्रथम, कु. भोसले नम्रता संतोष (76.16 टक्के) - व्दितीय तर चि. साबळे अजय सिध्देश्वर याने (76 टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

बारावी परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेले सर्व विद्यार्थ्यांचे माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक – विश्वस्त प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. हनुमंत कराड, प्राचार्य सायस मुंढे, प्रा. डॉ. अंगद चित्ते, प्रा. राजेश कांबळे, प्रा. तानाजी पवार, प्रा. चंद्रकांत जाधव, प्रा. बंडाप्पा उपासे, प्रा. रविशंकर कोरे, प्रा. श्रध्दा पाडे, प्रा. ज्योती उमरे, प्रा. सतिश दहिफळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم