अध्यात्म हे मानवाला शक्‍ती व आत्मविश्‍वास देणारे आहे - माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर

 अध्यात्म हे मानवाला शक्‍ती व आत्मविश्‍वास देणारे आहे

- माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर

लातूर दि.28-05-2023
भारत देशाचे माजी गृहमंत्री तथा पंजाबचे माजी राज्यपाल मा.शिवराजजी पाटील चाकूरकर यांनी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या कैलास निवासस्थानी त्यांना दिलेल्या निमंत्रणावरून भेट दिली. त्यावेळेस भारत देशातील व जगातील विविध अध्यात्मवादीविचार पाटील साहेबांनी सांगितले. विशेषतः रामायण, श्रीमद्भागवतगीतेचे जे महत्त्व मानवाच्या जीवनात आहे. त्यामुळे मानवाला सत्य, सदाचार व मानवनिर्मीती, राष्ट्रनिर्मीतीची प्रेरणा मिळते, संकटांना सामोरे जाण्याची शक्‍ती यातून मिळते. रामायण 5 हजार वर्षापूर्वी झाले, त्याची आजही गरज आहे. बायबल व कुराण यामध्ये अनेक चांगले विचार आहेत. वेद हे पुरातन काळातील असून त्यापासून अनेक ग्रंथाची निर्मिती झाली असे अत्यंत अभ्यासपूर्ण विचार मा.शिवराजजी पाटील चाकूकर साहेबांनी मांडले.
प्रारंभी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री तथा पंजाबचे माजी राज्यपाल शिवराजजी पाटील चाकूरकर यांचे स्वागत जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले तर युवा नेते शैलेश पाटील चाकूरकर, प्रा.बी.व्ही.मोतीपवळे, अ‍ॅड.सुभाषराव देवणीकर यांचे स्वागत जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर व जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार यांनी केले. सौ. अर्चनाताई पाटील यांचे स्वागत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर व सौ.आदितीताई अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم